NCP Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर आज अजित पवार आणि शरद पवार यांच्या आज बैठकी झाल्या. यावेळी त्यांनी एकमेकांवर आरोप केले. तेव्हा शरद पवार म्हणाले की, अजित पवार आणि सहकाऱ्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा न करता वेगळी भूमिका घेतली. यावर माझी काही तक्रार नाही पण मला त्यातं दुःख आहे. अशी टीका शरद पवारांनी अजित पवार आणि गटावर केली. ( Sharad Pawar Criticize Ajit Pawar in NCP Political Crisis)
Aamir Khanने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, “राजकुमार हिरानींसोबत करणार…”
पुढे शरद पवार म्हणाले की, कारण त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले त्यांनी विश्वासात न घेता पक्षाला विश्वासात न घेता ही भूमिका घेतली. तसेच जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यासोबत जायचं. लोकांना ज्या विचारधारेवर मतं मागितली त्या विचांरांच्या विरूद्धच्या पंगतीला जाऊन बसणं योग्य नाही अशी टीका पवारांनी केली.
जयंत पाटलांनी काढली अजित पवारांची लाज, शरद पवारांच्या वयावरून लगावला टोला
दरम्यान आता दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्हाच्या संदर्भात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला आहे. याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह 9 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याच्या उद्देशाने याचिका दाखल केली आहे.
दुसरीकडे आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेत्यांच्या बैठका घेणार पार पडल्या, या बैठकांमधून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. तर इकडे शरद पवारांच्या सभेमध्ये पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्त आहे. माझ्या बापाचा नाद करायचा नाही. अशा शब्दांत पवारांवर हल्लाबोल केला आहे.