Download App

महिला आरक्षणाचे निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतले, हे पंतप्रधानांना माहिती दिसत नाही; पवारांचा टोला

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On PM Modi : लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाला विरोधकांनी देखील एकमताने पाठिंबा दिला आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी हा पाठिंबा नाईलाजस्तव दिला असल्याचे म्हटले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

India Canada Row : पार्किंजवळच अडवलं अन् अंदाधुंद फायरिंग; निज्जरच्या हत्येचा थरार वाचा !

काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाबाबत विधान केलं की, काँग्रेस व काही पक्षांनी नाइलाजास्तव महिला आरक्षणाला पाठिंबा दिला. हे विधान अतिशय खेदजनक आहे. कारण सर्वांनी या निर्णयाला एकमताना पाठिंबा दिला असताना असं बोलणं योग्य नाही. तसेच महिला आरक्षणामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाना 33 टक्के आरक्षण दिलं. त्याचबरोबर मी संरक्षणमंत्री असताना नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीमध्ये महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाचे आभार मानत राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना इशारा, ‘दुकानदारांवर महाराष्ट्र सैनिकांचं लक्ष असेल’

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हा महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात आलं. त्यावेळी मीच महारष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्याचबरोबर जेव्हा नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीमध्ये महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं तेव्हा त्या निर्णयाला विरोध देखील झाला होता. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे देशात महिला आरक्षणबाबत जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत होते. याची माहिती पंतप्रधान मिळालेली दिसत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

धनगर आरक्षण! गिरीश महाजन उपोषणकर्त्यांच्या भेटीला, पालकमंत्री विखेंच्या विरोधात घोषणाबाजी…

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावणे हे अन्यायकारक आहे. केवळ भारतात नाही. तर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे परिणाम होतात. कांदा निर्यातीमध्ये भारतचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेतली तर सतत कांदा खरेदी बंद पडणे, निर्यात बंद करणे, एक्सपोर्ट ड्युटी वाढवणे या सातत्याच्या भूमिकेमुळे आपल्या देशात सातत्य नाही. ही प्रतिमा जगभरात तयार होते. ती घातक आहे. मी अहमदाबाद येथे गेलो होतो. तिथे बारामती येथील उद्योजकाने एक कंपनी काढली आहे. या उद्योजकांच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. तेथे त्या उद्योजकाने गौतम अदानी यांना देखील बोलावल होत. म्हणून त्यांची आणि माझी भेट झाल्याचं यावेळी पवारांनी सांगितलं.

Tags

follow us