India Canada Row : पार्किंगजवळच अडवलं अन् अंदाधुंद फायरिंग; निज्जरच्या हत्येचा थरार वाचा !

India Canada Row : पार्किंगजवळच अडवलं अन् अंदाधुंद फायरिंग; निज्जरच्या हत्येचा थरार वाचा !

India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून सध्या कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Row) ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. तेव्हापासून हा वाद वाढतच चालला आहे. यानंतर आता निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येसंदर्भात एक व्हिडीओ समोर आल्याचे सांगितले जात आहे. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने या व्हिडिओचा हवाला देत माहिती दिली आहे, की निज्जरच्या हत्येत कमीत कमी सहा लोकांचा समावेश होता. ज्यांच्याकडे दोन वाहने होती. वॉशिंग्टन पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की कॅनडातील स्थानिक शीख नागरिकांचे म्हणणे आहे की अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत फारशी माहिती दिलेली नाही. पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले. येथील सिक्युरिटी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हत्येचा व्हिडीओ तपास यंत्रणांकडे देण्यात आला आहे.

भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की पार्किंगमध्ये निज्जरचा पिकअप ट्रक होता. तिथे एक सेडान कारही होती. ट्रक पार्किंगमधून बाहेर पडत असताना सेडान कार पिकअपच्या बाजूला उभी राहिली. त्यानंतर सेडान वाहनातून दोघे जण उतरले आणि त्यांनी ट्रकचालकारव बंदूक रोखली, असे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. तब्बल 50 गोळ्या झाडल्या. यातील 34 गोळ्या निज्जरला लागल्या. घटनास्थळी रक्ताचा सडा आणि काचांचे तुकडे पडलेले दिसत होते. त्याचवेळी एक अधिकाऱ्याने निज्जरला पिकअप ट्रकमध्ये बसवून हल्लेखोरांचा पाठलाग केला.

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितले की गोळीबारानंतर पोलिसांनी येथे पोहोचण्यास 12 ते 20 मिनिटे लागली. ज्या ठिकाणी हत्या झाली तेथे पोलीस नेहमीच मोठ्या संख्येने गस्त घालत असतात तरी देखील घटना घडली त्यावेळी येथे यण्यास पोलिसांना इतका वेळ का लागला असा सवाल या लोकांनी उपस्थित केला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सरे पोलीस आणि रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (आरसीएमपी) यांच्यात हत्येचा तपास कोण करणार या मुद्द्यावर तासभर वाद सुरू होता. दरम्यान, या प्रकरणी आरसीएमपी पोलिसांनी तपास करावा अशा सूचना सरे पोलिसांनी दिले.

India Canada Row : भारताच्या एका निर्णयामुळे डळमळीत होऊ शकते कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम

निज्जरच्या हत्येनंतर काय काय घडलं?

निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपांनंतर कॅनडा सरकारने तेथील ओटावा येथील सर्वोच्च भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांना निलंबित केले. कॅनडाच्या या कारवाईला त्याच भाषेत भारताकडून प्रत्युत्तर देत कॅनडाचे नवी दिल्लीतील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्यांना 5 दिवसांत देश सोडण्यासही सांगण्यात आले.

ट्रुडो यांच्या विधानानंतर ओटावा येथील सर्वोच्च भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली. ते पंजाब केडरचे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते कॅनडातील भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंगमध्ये (RAW) स्टेशन चीफ म्हणून कार्यरत होते. यानंतर भारताने याला प्रत्युत्तर देत परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीस्थित कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करत त्यांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube