Sharad Pawar : पराभूत होऊन देखील प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं(Sharad Pawar ). ते पुस्तक लिहिताय हे चांगलं. मी वाट बघतोय ते माझ्यावर पुस्तक लिहीत आहेत त्याची.
लोक पक्ष सोडून का जातात? त्यांनी पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी आपल्या घरी ईडी का आली? आपलं घर ईडीने का ताब्यात घेतले? याचा एक चॅप्टर पुस्तकात लिहावा. असा टोला प्रफुल पटेल यांना शरद पवार (Sharad Pawar ) यांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पटेलांच्या पुस्तकासाठी पवारांनी सुचवला ‘चॅप्टर’ …
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या सर्व आरोपांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील पक्षाच्या मेळाव्यातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच काही गंभीर आरोप केले होते. तर प्रफुल पटेल यांनी देखील आपण पुस्तक लिहून पवारांच्या अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी पटेलांच्या पुस्तकासाठी चॅप्टरच सुचवला आहे.
Ahmednagar : शेतकरी सातबारावरती नोंदच करत नाहीत, मदत कशी मिळणार? मंत्री विखे पाटलांचा सवाल
यावेळी शरद पवार म्हणाले की, प्रफुल पटेल पुस्तक लिहिताय हे चांगलं आहे. ते माझ्यावर पुस्तक लिहीत आहेत त्याची मी वाट बघतोय. तसेच त्यांनी या पुस्तकामध्ये लोक पक्ष सोडून का जातात? हे देखील लिहावं. तसेच त्यांनी त्यामध्ये त्यांच्या बंगल्याचे काही मजले ईडीने ताब्यात का घेतले? यावर देखील या पुस्तकामध्ये लिहावं. असा टोला लगावत शरद पवार यांनी प्रफुल पटेलांना पुस्तकासाठी प्रकरणच सुचवलं आहे.
काय म्हणाले होते पटेल?
माझे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत. पण आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात आहे. आता आपण सगळे अजितदादा यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी शरद पवारांसोबत होतो आता कायमस्वरूपी अजित पवार यांच्यासोबत असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी मी माझी बाजू मांडणार असल्याचं पटेलांनी स्पष्ट केलं.