Download App

‘जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये…’; प्रफुल्ल पटेलांना क्लीनचीट मिळताच पवारांची टीका

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Praful Patel Cleanchit : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांना (Praful Patel) सीबीआयने (CBI) मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने एअर इंडियासाठी विमान भाडेतत्वावरील कथित अनियमिततेच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांना क्लीनचीट दिली. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे न सापडल्याने सीबीआयने ही केस बंद केली. पटेल यांना सीबीआयकडून क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mukhtar Ansari : कुख्यात माफिया जो, सिस्टीमशी खेळता खेळताच संपला… 

आज शरद पवार साताऱ्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेलांना क्लीनचीट देणारच ना. एककाळ असा होतो जेव्हा ते आमच्याबरोबर होते, तेव्हा आम्ही चिंतेत होतो. पण, आता एक नवीन गोष्ट दिसतेय. आता एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेलं बरं, असं शरद पवार म्हणाले.

Sangli News : सांगलीच्या पैलवानाला ‘मातोश्रीचा’ आशीर्वाद मिळवून देणारा वस्ताद ‘राष्ट्रवादीचा’? 

सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून लढण्याची उदयनराजे भोसलेंची इच्छा आहे. मात्र, अद्याप महायुतीने त्यांना उमदेवारी जाहीर केली नाही. तर महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्तेत होतं. मात्र, पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. दरम्यान, आता उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटीवर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना उमदेवराी देणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर बोलतांना पवार म्हणाले की, उदयनराजेंना उमदेवारी देण्याचा प्रश्नच नाही. ते सध्या भाजपमध्ये आहेत, ते आमच्याकडे येण्याचा प्रश्नच नाही, असं पवार म्हणाले.

साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमदेवार लढणार
पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. यावरही पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा आमच्या पक्षाकडे आहे. त्यामुळं इथं कॉंग्रेसचा उमदेवार उभी राहिल, या चर्चेत काही अर्थ नाही.

वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच
मनोज जरांगेंनी प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. त्याविषयी विचारले असता पवार म्हणाले, मनोज जरांगे आणि माझी चर्चा नाही. आंदोलनाच्या काळातच मी त्यांनी भेटलो. लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मान्य केला पाहिजे, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीने आमच्याबरोबर यावं, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही पवार म्हणाले.

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवार कोणत्या नावाला मान्यता देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us