Mukhtar Ansari : कुख्यात माफिया जो, सिस्टीमशी खेळता खेळताच संपला…

Mukhtar Ansari : कुख्यात माफिया जो, सिस्टीमशी खेळता खेळताच संपला…

Mukhtar Ansari Death : 28 मार्च 2024. कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा (Mukhtar Ansari Death) उत्तर प्रदेशातील बांदा कारागृहात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मुख्तारच्या मृत्यूने उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी विश्वातील आणखी एक बडा मासा दिसेनासा झाला. मुख्तार फक्त आरोपीच नव्हता तर दहशतीसाठीही ओळखला जात होता. मग ती दहशत जनसामान्यातली असो, सरकारी यंत्रणातली असो की कारागृहाच्या आतील असो.  या सगळ्यात मुख्तारचाच दबदबा होता.  स्वतः पाळलेल्या टोळ्यांच्या मदतीने दहशत पसरवायची, जेलमध्ये गेला तरी राजेशाही बडदास्त, न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन सहीसलामत सुटका करून घ्यायची याचं खास तंत्र मुख्तारनं विकसित केलं होतं.

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

1986 साली मुख्तारचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. सध्या त्याच्यावर 61 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 खुनाचे गुन्हे तो तुरुंगात असताना दाखल झाले होते. गाजीपूर तुरुंग असो,  बांदा तुरुंग असो किंवा पंजाबचं रोपल जेल त्याची व्हिआयपी ट्रिटमेंट सगळीकडे सारखीच. जेलर कोणताही असो रुबाब चालायचा तो मुख्तारचा. तुरुंगातील अधिकारीही त्याच्याशी पंगा घ्यायला कचरत. त्यामुळेच मग तुरुंगात त्याच्यासाठी शाही बडदास्त ठेवली जायची. मुख्तार तुरुंगातूनच टोळ्या चालवत असायचा. मार्च 2023 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका शूटरच्या जामिनावर सुनावणी दरम्यान मुख्तार गँगला देशातील सर्वाधिक धोकादायक टोळी म्हटले होते.

योगींनी फाईल बाहेर काढली अन् मुख्तारला पहिली शिक्षा

उत्तर प्रदेश विधानसभेचं सत्र सुरू होणार होतं. मऊ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार मुख्तार अन्सारी त्यावेळी तुरुंगात होता. अधिवेशनात भाग घेण्यासाठी त्याला लखनऊला आणण्यात आलं होतं. 23 एप्रिल 2003 नंतर काही लोक सकाळी 10.30 वाजता मुख्तारला भेटण्यासाठी कारागृहात आले. मुख्तार आला आणि त्याने या लोकांची झडती न घेताच त्यांना येऊ देण्यास सांगितले.

जेलर एसके अवस्थींनी पाहिलं की मुख्तारला भेटण्यासाठी आलेले लोक थेट जेलच्या गेटच्या आत आले होते. मग त्यांनी या सर्व लोकांची झडती घेण्याचे आदेश दिले. यामुळे मुख्तार अस्वस्थ झाला. लगेच त्याने साथीदाराकडील रिव्हॉल्व्हर काढली, अवस्थींवर रोखली आणि त्यांना धमकावले. या प्रकरणात अधिकाऱ्यांचा दबाव झुगारत अवस्थींनी मुख्तारविरुद्ध गु्न्हा दाख केला होता.

Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू; जेलमध्येच आला ह्रदयविकाराचा झटका

परंतु, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. काळ बदलला पुढे 2007 मध्ये एसके अवस्थी गाजीपूर जेलमध्ये तैनात केले गेले. याच जेलमध्ये बंद असलेल्या मुख्तारला अवस्थी येथे येण्याआधीच आगऱ्याच्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. अवस्थींनी पाहिलं की जेलमध्ये मुख्तारसाठी बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं. येथे काही अधिकारी बॅडमिंटन खेळण्यासाठी येत होते. या आलिशान व्यवस्था अवस्थींच्या डोळ्यात खटकली. त्यांनी एक अहवाल तयार करून सरकारला धाडला. 30 जून 2013 मध्ये अवस्थी रिटायर झाले.

यानंतर मुख्तारने न्यायप्रणातील त्रुटींचा फायदा घेत 30 जून 2014 रोजी लखनऊ अपर जिल्हा न्यायाधीश एडीजे कोर्टात अर्ज देत अवस्थी यांना पुन्हा बोलावण्यात यावे अशी विनंती केली. त्यांना बोलावण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2014 रोजी क्रॉस एग्जामिनेशन झालं. यावेळी मात्र अवस्थी त्यांच्या 10 वर्षांपूर्वीच्या मूळ जबाबावर कायम राहिले नाहीत. 23 डिसेंबर 2020 रोजी एडीजे कोर्टाने मुख्तारची मुक्तता केली.

यानंतर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ही फाईल पुन्हा बाहेर काढली. मुख्तारच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. निष्णात वकिलांची फौज उभी केली. अखेर सहा महिन्यांनंतर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने जेलरला धमकी दिल्याच्या प्रकरणात मुख्तारला दोषी धरत 7 वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावली. कोणत्याही अपराधिक प्रकरणात मुख्तारला मिळालेली ही पहिलीच शिक्षा.

दहशत इतकी की दीड वर्ष जेलरची खुर्ची रिकामी 

मागील वर्षी सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार मुख्तारला पंजाबमधील रोपल जेलमधून यूपीतील बांदा कारागृहात आणण्यात आलं. 16 मे 2021 रोजी उन्नाव जेलचे जेल अधीक्षक एके सिंह यांची बांदा ट्रान्सफर झाली. यानंतर 17 ऑक्टोबर रोजी ते मेडिकल लीव्हवर गेले पण परत आलेच नाहीत. यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी बरेली येथून विजय विक्रम सिंह बांदा येथे बदलीवर आले. परंतु ते येथे हजरच झाले नाहीत. मग त्यांना 29 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर या कारागृहात प्रभारीराज सुरू आहे.

पाच वेळा आमदार पण, लोकसभेत पराभूत 

1996 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. 2002,2007, 2012 आणि 2017 मध्ये मऊ मधून विजयी. वेगवेगळ्या तुरुंगात राहून तीन निवडणुका जिंकल्या. 2010 मध्ये बसपा प्रमुखांनी अन्सारीची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर मु्ख्तारने कौमी एकता दल नावाचा पक्ष स्थापन केला. पुढे 2017 मध्ये हा पक्ष बसपात विलीन केला. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढली परंतु दोन्ही निवडणुकीत पराभव.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube