Rohini Khadse On Sudhakar Badgujar : उद्धव ठाकरे यांचा हात सोडत सुधाकर बडगुजर यांनी आज अखेर भाजपचं कमळ हाती घेतलंय. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि बबन घोलप यांनी भाजपात प्रवेश केलायं. भाजपप्रवेशानंतर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी ट्विट करीत बडगुजर यांच्यावर थेट वार केलायं. नितीश कुमार तर उगाच बदनाम आहे, त्यांच्यापेक्षा मोठे पलटूराम महाराष्ट्रात असल्याची टीका खडसे यांनी केलीयं.
नितीश कुमार तर उगाच बदनाम आहे त्यांच्या पेक्षा मोठे पलटूराम महाराष्ट्रात आहेत.
आज नाशिकचे सुधाकर बडगुजर @BJP4Maharashtra मध्ये प्रवेश करत आहेत. याच बडगुजरांवर, दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. हिंदू धर्माशी, देशाशी गद्दारी वगैरे… pic.twitter.com/BQX20MOt5O
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 17, 2025
रोहणी खडसे ट्विटमध्ये म्हणाल्या, “नितीश कुमार तर उगाच बदनाम आहे त्यांच्या पेक्षा मोठे पलटूराम महाराष्ट्रात आहेत. आज नाशिकचे सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याच बडगुजरांवर, दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. हिंदू धर्माशी, देशाशी गद्दारी वगैरे बोलले गेले होते. आज भाजपची वॉशिंग मशीन अशी काही फिरली की बडगुजर चकाचक झाले. कधीकाळी ज्यांना हिरवे वाटत होते, ते भगवामय झाले” असं ट्विट त्यांनी केलंय.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा करुन दिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपकडून पक्षप्रवेशाचं धुमशान सुरु आहे. त्यातच आज बबन घोलप, सुधाकर बडगुजर यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश केलायं.
प्रताप सरनाईकांचा लेटर बॉम्ब ठरणार 2022 प्रमाणेच भविष्यातील वेगळ्या राजकारणाची नांदी?
काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.
बडगुजर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान, अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ही दुपारी 2 वाजताची देण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार मंत्री गिरीश महाजनांसह इतर भाजप नेते कार्यालयात पोहोचले खरे पण चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे पोहोचलेच नाहीत. अखेर अनेकांना फोन केल्यानंतर बावनकुळे आणि चव्हाण हे पक्ष कार्यालयात आले.