Download App

शरद पवार अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते, भाजपकडून हल्लाबोल

BJP on Sharad Pawar : फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं, असे प्रत्युत्तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने दिले आहे.

शरद पवार गटाकडून भाजप आणि बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या X सोशल मीडियावरुन म्हटले की आदरणीय पवार साहेब यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे. याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं! फक्त एक राहून गेलं, ते म्हणजे आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापण्याची मुळीच राहिलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो.

राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपच्या X सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर दिले आहे. त्यात म्हटले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे, असे म्हटले आहे.

Maratha Reservation : आरक्षण टिकणाराच निर्णय घेणार; DCM देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही, अशी टीका केली.

धार्मिक राजकारणाचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर 13 व्वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याचा कांगावा मतं मिळवण्यासाठी तुम्ही केला होता, असे म्हटले आहे.

Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली

भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्विकारले नाही. तुम्ही अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते आहात, अशीट टीका केली आहे.

Tags

follow us