Download App

दिल्लीतही ‘रमी’ची चर्चा, खासदार विचारतात रमी खेळणारा मंत्री कोण? सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

मला दिल्लीत विचारलं जातं की रमी खेळणारा मंत्री नेमका कोण, असा टोला सुळे यांनी लगावला.

Supriya Sule Criticized Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठलं. विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. सरकारवर दबाव वाढत चालल्याने कदाचित मंगळवारी कोकाटे राजीनामा देतील अशी दाट शक्यता आहे. या घडामोडी घडत असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. मला दिल्लीत विचारलं जातं की रमी खेळणारा मंत्री नेमका कोण, असा टोला सुळे यांनी लगावला.

सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? खा. सुळेंचा दावा

नेमकं काय म्हणाल्याा सुप्रिया सुळे?

महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे. दिल्लीतले खासदार मला थांबून थांबून विचारत होते की रमीचा काय प्रकार सुरू आहे? कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे? असे अनेक प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले जातात. राज्यात कुठलीही घटना घडली की देशभर जाते राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झाली आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कोकाटेंनी राजीनामा द्यावा

ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामे द्या स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्थी केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट

या दीडशे दिवसांत महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. याचा जबाब या सरकारला द्यावा लागेल. वाल्मिक कराड जेलमधून फोनवर बोलत आहे. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे. आता आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आम्ही वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील दोन केससाठी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे त्याबद्दल अमित शहांशी बोलणार आहोत तसेच महादेव मुंडे खून प्रकरणाबाबतही शाह यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या भेटीची वेळ आम्ही मागितली आहे, असे सु्प्रिया सुळे यांनी सांगितले.

आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटं दूर व्हावीत; राजीनाम्याची टांगती तलवार, कोकाटेंकडून शनीदेवांचा धावा

follow us