Download App

कर्नाटकात कोणाची सत्ता येणार ? भाजपला डिवचत शरद पवारांनी सांगितला अंदाज

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा अंदाजही वर्तविला आहे. कर्नाटकात भाजपवर जनता नाराज आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज पवार यांनी वर्तविला आहे. त्याचबरोबर पवार यांनी भाजपची आता पाच-सहा राज्यात सत्ता असल्याचे सांगून भाजपला डिवचले आहे.

Manipur Violence : शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ निर्णय

शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. त्या ठिकाणी काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. तर अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. केरळ, तामिळनाडू राज्यात भाजपची सत्ता नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये सत्ता नाही. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंमुळे भाजपची सत्ता आलेली आहे.

शरद पवार राजकीय आखाड्यातून थेट डाळिंबाच्या बागेत…

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तेथे काही आमदार फोडून भाजपने आपली सत्ता आणलेली आहे. हरियाणा, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. आज केवळ पाच चे सात राज्यामध्ये सत्ता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता सांगता येणार नसल्याचे पवार यांनी सांगितला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येणार आहे, असे म्हटले आहे. या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिले नाही. परंतु बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ नये, यासाठी लोकांचा विरोध आहे, त्यामुळे हा प्रकल्प होऊ नये, अशी भूमिकाही शरद पवार यांनी जाहीर केली आहे.

Tags

follow us