Manipur Violence : शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Manipur Violence : शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Manipur Violence : मणिपूरमध्ये सध्या हिंसाचार उसळला (Manipur Violence) असून परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे देशातील राज्य सरकारे अलर्ट झाली असून तातडीने महत्वाची पावले उचलली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला आहेत. ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत. स्थानिक तणावामुळे विद्यार्थी काळजीत आहेत.

या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, भाजप आणखी एक मानहानीचा खटला दाखल करणार

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला. देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल. शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्यावतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मणिपूर येथे उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा बळी गेला आहे. 3 मे रोजी मणिपूरमध्ये ऑल ट्राइबल स्टुडंट्स युनियनकडून एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर येथे हिंसाचार उसळला. या घटनेनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शूट अॅट साईटचा आदेश प्रशासनाने दिला.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube