शरद पवार राजकीय आखाड्यातून थेट डाळिंबाच्या बागेत…
Sharad Pawar : राजीनामा मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीच्या (Baramati)दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांचे कर्मभूमीत जोरदार स्वागत करण्यात आले. गोविंदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गोविंदबागेत (govindbaug) पत्रकारांची भेट घेतल्यावनंतर पवारांनी कृषी विज्ञान पार्कला भेट दिली. त्याचनंतर शरद पवारांनी फलटण (Faltan) तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या 20 एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींबाच्या बागेला भेट दिली. त्यावेळी पवारांनी शेतकऱ्याच्या कष्टाचं फेसबुकवर पोस्ट लिहून कौतुकही केलं आहे.
आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या 20 एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींब बागेला भेट दिली. चंद्रकांत अहिरेकर त्यांच्या शेतामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाचे एकरी 10 टन इतके दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतात. तसेच सुमारे 80 टक्के माल हा आखाती देशात आणि युरोपात निर्यात करतात.
बागेचं वर्णन करताना पवारांनी म्हटलंय की, अहिरेकरांनी डाळिंबाची बाग अतिशय स्वच्छ ठेवली असून फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांवर आच्छादनाचा वापर केला आहे. अहिरेकर कुटूंब घेत असलेल्या कष्टाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक, असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.