लंकेंना उमेदवारी देऊ नका, या विनंतीसाठी विखेंनी उद्योजक पाठवला होता : पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar On Radhakrishna Vikhe: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी नगरमध्ये एक सभा घेतली आहे. या सभेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत विखे कुटुंबावर टीकाही केली. निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही […]

लंकेंना उमेदवारी देऊ नका, या विनंतीसाठी विखेंनी उद्योजक पाठवला होता : पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar

Sharad Pawar On Radhakrishna Vikhe: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी नगरमध्ये एक सभा घेतली आहे. या सभेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत विखे कुटुंबावर टीकाही केली. निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, असा निरोप उद्योजक घेऊन आला होता. हा निरोप महसूलमंत्र्यांना उद्योजकामार्फत पाठविला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

जुमल्याचं नाव गॅरंटी, आता भाजप चारशे पार नाही, तडीपार होणार; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र


सुजय विखेंवर टीका

माझ्या वाचण्यात आले. विरोधी उमेदवारींना प्रश्न उपस्थित केला की पार्लमेंटमध्ये इंग्रजीत बोलायचे असते. पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. मी स्वतः इंग्रजी आणि हिंदीत आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोलतो आहे. मराठीत बोलण्याचा अधिकार आहे. हिंदी आणि इंग्रजीचे भाषांतर करण्याची सुविधा असते असे म्हणत पवारांनी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर टीका केली आहे.

जुमल्याचं नाव गॅरंटी, आता भाजप चारशे पार नाही, तडीपार होणार; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र


बाळासाहेब विखेंनी भाऊसाहेब थोरातांची माफी मागितली

बाळासाहेब विखे यांच्या लोकसभा निवडणुकीची एक किस्साही शरद पवारांनी भाषणात सांगितला. बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभे राहायचे होते. तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मी नगरच्या दौऱ्यावर होतो. एक वाजता विखे हे माझ्याकडे आले. त्यांना भाऊसाहेब थोरात यांची मदत हवी होती. बाळासाहेब विखे यांना गाडीत बसवून रात्री तीन वाजता भाऊसाहेब थोरातांच्या जौर्वे या गावी गेलो. त्यांनी झाले गेले विसरून जाऊ, अशी विनंती थोरातांनी केली होती. थोरात यांनी माफ केले आणि विखे हे विजयी झाले. आता ते बाळासाहेब थोरातांवर टीका करत आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे माणुसकी नाही. पक्ष बदलण्यावरून शरद पवारांनी विखेंवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version