Download App

शिल्लक कोण आहे ते तर बघू द्या; राज ठाकरेंच्या टिकेला पवारांचे उत्तर

Sharad Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेनं रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल, अशी टीका पवारांवार केली होती. दरम्यान, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) टीकेवर आता शरद पवारांनी भाष्य केलं. (Sharad Pawar On Raj Thackeray and ajit pawar oath)

दुसरी किंवा तिसरी टीम हा मुद्दा नाही. उद्याच्या निवडणुकीत आमची नवी टीम पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पुण्यात बोलत होते.

पवार म्हणाले, ‘दुसरी टीम आमच्याकडे कोण आहे, ती तर पाहू द्या. ज्यांना जायचे होते, ते थांबणार नव्हते. जे जाणार नाहीत ते थांबले आहेत. त्यामुळे दुसरी किंवा तिसरी टीम हा मुद्दा नाही. उद्याच्या निवडणुक झाल्यावर आमची नवीन टीम पाहायला मिळेल.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया… 

अजित पवारांचा फोन आला होता का? वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं सांगतात, या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलं की, कोणाचाही फोन आला नाही, त्यांना दुसरे कोणतरी वरिष्ठ असू शकतात. ते म्हणाले, सत्तेच्या जोरावर त्यांची चार-दोन कामं होतील. पण, शेवटी महत्त्वाचं असतो तो लोकांचा पाठिंबा. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना जनतेच्या पाठिंब्याची चिंता आहे. तर आमची खरी शक्ती सामान्य माणूस आहे असं सांगत संघटना आणखी मजबुत करणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नियुक्ती मी केली होती. त्यांनी आपली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही पवारांनी दिलं.

 

 

Tags

follow us