Election Commission PC : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला (NCP Sharad Pawar) पिपाणी या चिन्हामुळे मोठा फटका बसला आणि एक खासदार जिंकता जिंकता हरला असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असा गोधळ होऊ नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार असा सवाल आज पत्रकारांनी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांना विचारला होता. यावर भाष्य करत त्यांनी मी या विषयावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्य आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग राजीव कुमार म्हणाले की, चिन्हाबाबात आम्ही ऑर्डर दिले आहे मात्र त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आयोगाने राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणूक आयोगाच्या या दौऱ्यानंतर राज्यात कधी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार याकडे आता सर्वांचे लागून आहे.
तसेच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात निवडणुकीच्या काळात एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचं बंधण असणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच या काळात रुग्णवाहिका, बँका आणि पतसंस्थांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे असं देखील ते म्हणाले. याच बरोबर 50 टक्के बूथवर वेब कास्टिंग होणार असून शहरी भागातील मतदान केंद्रांवर 100 टक्के सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
हितचिंतकांनी खोटा प्रचार केला पण भाजप …, सुनिल तटकरेंनी विरोधकांना सुनावलं
तसेच मतदानकेंद्रावर शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल. जिथे लांबच लांब रांग असेल तिथे खुर्च्यांची व्यवस्था असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुविधा दिल्या जातील. मतदारांच्या अडचणीसाठी सक्षम ॲप तयार केले आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.