Download App

खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Sabha For Harshvardhan Patil In Indapur : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. प्रचारासाठी काही तासांचा कालावधी उरलेला आहे. दरम्यान आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. हर्षवर्धन पाटलांसाठी आज जाहीर प्रचार सभा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळी आम्हाला संविधान वाचवायचं होतं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात काहीतरी छेडछाड करावी, असं होतं. या घटनेचा महत्व आहे. आज देश इतके वर्ष एकसंघ असण्याचं कारण घटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतात लष्कराने देशाचा कारभार हातात घेतला, असं अजून घडलेलं नाही.

विरोधकांनी रक्ताचे शोषण केले, सांगता सभेत हर्षदा काकडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

जे राज्यकर्ते शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करतील, त्यांना राज्य करण्याचा अधिकार असल्याचं शरद पवार जाहीर सभेत म्हणाले आहेत. आपल्या हिताचा, राज्याचं हिताचं निर्णय घ्यायची वेळ आलीय. आमची एक चूक झाली. निवडणुकीला उभं राहायचं म्हणाले मदत केली. आम्ही सत्ता भरणेंच्या हातात दिली. परिणाम काय झाला? शेतकरी सहाशे रूपये इतका कमी भाव घेत आहेत. खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला अशी टीका त्यांनी दत्तामामा भरणे यांच्यावर केली नाही.

पाण्याचं वचन पूर्ण केलं, आता उद्योगक्रांतीचं; तानाजी सावंतांची मतदारांना साद

उभं राहायचं, महाराष्ट्रातील जनतेचं जीवन सुधारेल यासाठी प्रयत्न करायचे याला म्हणतात नेतृत्व, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. हे नेतृत्व खुजं नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला. त्यामुळे वेळीच निर्णय घ्यावा लागेल. भरणेला नुसतं पाडायचं नाही तर पाडायचं…पाडायचं… पाडायचं. हा निकाल तुम्ही घ्या. चित्र बदलेल असं आश्वासन देखील शरद पवार यांनी दिलंय. यावेळी हर्षवर्धन पाटलांसाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करण्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी केलंय.

 

follow us