पाण्याचं वचन पूर्ण केलं, आता उद्योगक्रांतीचं; तानाजी सावंतांची मतदारांना साद

पाण्याचं वचन पूर्ण केलं, आता उद्योगक्रांतीचं; तानाजी सावंतांची मतदारांना साद

Tanaji Sawant News : मराठवाडा जलसिंचन उपसा योजनेतून पाण्याचं वचन पूर्ण केलं आता उद्योगक्रांतीचं वचन पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या, अशी साद महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मतदारांना घातलीयं. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असून केलेल्या विकासकामांचा उल्लेख करीत उमेदवारांकडून मतदारांना साद घालण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओ तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलायं.

तानाजी सावंत म्हणाले, 2019 च्या निवडणुकीला मराठवाडा जलसिंचन उपसा योजनेतून पाणी आणण्याचं वचन मी दिलं होतं, हे वचन मी आज पूर्ण केलंय. आता 2024 ते 2029 शिवजल क्रांती, धवलक्रांती, हरितक्रांती, उद्योगक्रांती या सर्व परिक्षेत पास होऊन तुमचं वचन मी पूर्ण करणार असल्याचं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलंय.

तसेच एमआयडीसी रोजगार, दुध संघ, बॅंकेची निर्मीती मतदारसंघाच्या विकासासाठी मला निवडून देणार हा मला विश्वास असून मी तरुण मित्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून मला विजयी करा, असं आवाहन सावंत यांनी केलंय.

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

दरम्यान, ‘ धनुष्यबाण ‘ हे केवळ चिन्ह नाही, तर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे उज्ज्वल भविष्य आहे, त्यामुळे जनता मला पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवणार असल्याचा विश्वासही तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube