गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

Pune News : गणेश मंडळातील एक कार्यकर्ता म्हणून आजवर काम करत आलेले भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या (Hemant Rasne) विजयासाठी कसबा मतदारसंघातील मंडळांची वज्रमूठ तयार झाली आहे. आज रासने यांच्या प्रचारार्थ गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.

लहानपणापासून गणेश मंडळामध्ये सक्रिय असणारे आणि आज राजकीय जीवनात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हेमंत रासने यांनी केलं आहे. गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला येणाऱ्या अडचणींची एक कार्यकर्ता म्हणून रासने यांना जाणीव आहे. या अडचणी कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ते सर्वतोपरी मदत करतील, असा विश्वास यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी! कसब्यात हेमंत रासनेंना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सुनील रासने, दत्ता सागरे, महेश सूर्यवंशी, मंदार जोशी, विकास पवार, नितीन पंडित, पराग ठाकूर, सौरभ करडे, मंदार परळीकर, सूर्यकांत पाठक, शिरीष मोहिते, पियुष शहा, राकेश डाखवे, अजय दराडे, अशोक जाधव, विनायक घाटे, स्वप्नील दळवी, किरण सोनिवाल, कुमार रेणूसे, प्रकाश राऊत उपस्थित होते.

रासनेंना अखिल भारतीय मराठा महासंघाचाही पाठिंबा

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान (Assembly Election 2024) अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलंय. उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे रासने यांची कसब्यात ताकद वाढली आहे.

मविआत धुसफूस! कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, ठाकरे गटाची मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube