Sharad Pawar Sabha For MVA Candidate Rahul Kalate : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे (Rahul Kalate) विधानसभा निवडणुकीच्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांचा प्रचार आता शिगेला आहे. राहुल कलाटेंसाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज राहुले कलाटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राहुल कलाटे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत मतदारांना तुतारीला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
राहुल कलाटे यांनी यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार (Assembly Election 2024) म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी शरद पवारांचे आभार मानलेय. कलाटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड नगरपालिकेत काम करत असताना मी नगरसेवक म्हणून गटनेता म्हणून काम केलंय. या काळात जी चुकीची कामे झालीत, त्यांना विरोध करण्याचं काम आम्ही सभागृहात केलंय. माझ्या प्रभागातील 18 रस्त्यांचं काम थांबवलं गेलं. त्या ठिकाणी मतदान झालं आणि त्या मतदानात नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली आणि आज त्या सर्व रस्त्यांचं काम पूर्ण झालंय.
या ठिकाणची विकासकामं थांबवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय. या परिसरात पाणीटंचाई, ट्राफिक असे असंख्य प्रश्न आहेत. या प्रभागात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याचा प्रश्न आहे. जे नागरिक या प्राधिकरणाच्या हद्दीत राहत होते, त्यांच्या घरांचा आहे. आम्ही यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली, या सगळ्या घरांची मालकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली. येणाऱ्या काळात या सर्व नागरिकांचे घरं नावावर करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करेल, असं आश्वासन भरसभेमध्ये राहुल कलाटे यांनी दिलाय.
सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. साहेबांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची? हे ठरवण्याची यंदाची निवडणूक आहे. याचा निर्णय तुम्ही घेणार, असं राहुल कलाटे मतदारांना उद्देशून म्हणाले आहेत. पुढच्या पिढीला सत्याची शिकवण द्यायची असेल, तर सत्तापरिवर्तन करावं लागेल. हे फक्त तुमच्या हातात आहे. हे 20 तारखेला निश्चित आहे. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करा, असं आवाहन कलाटेंनी केलंय.