Download App

Sharad Pawar : नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा; पवारांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा आहे. असं म्हटलं आहे. तसेच नार्वेकरांनी अशा भेटी घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. असा देखील आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते आज (9 जानेवारी) दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Krishna- Ayesha Shroff: ‘आई अन् लेकीच्या प्रश्नांची गुगली, असा रंगला धमाल रॅपिड फायर…

पवार म्हणाले की, आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असतील तर साधी सरळ गोष्ट आहे. ज्याची केस आहे आणि ज्याच्या समोर मांडली जाणार आहे. तोच व्यक्ती जर ज्याची केस आहे. त्याला भेटत असेल तर संशयाला जागा निर्माण होते. यामुळे चिंता देखील वाटते. तसेच नार्वेकरांनी अशा भेटी घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. असा देखील आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar : आव्हाडांना दिल्लीत धाडणार; मविआच्या बैठकीचा पवारांनी सांगितला प्लॅन

तर दुसरीकडे आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने ज्या राजकीय घडामोडी घडून गेल्या आणि सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले. काल विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे तर धक्कादायक आहे आणि घटनेच्या कुठल्याच नैतिकतेत बसत नाही अशा शब्दांत त्यांनी अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे शिवसेना (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी (MLA Disqualification Case) सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या मुदतवाढीचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणाचा निकाल येईल असे सांगण्यात येत आहे.

follow us