Download App

शरद पवार ठाम! ‘वेळ पडल्यास नवी चळवळ उभी करू पण, भाजपसोबत जाणार नाही’

Sharad Pawar : पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा शरद पवारांनी सागितलं की, आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत जाणार नाही. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तरी राष्ट्रवादी कधीही आपल्या विचार धारेशी कधीही तडजोड करणार नाही. एकवेळ नव्याने सर्व काही उभं करायची वेळ आली तरी चालेल. पण भाजपसोबत तडजोड करणार नाही. असं पवार म्हणाल्याचं राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. ( Sharad Pawar says never gone with BJP when Pune NCP activist meet in Delhi )

विश्वास प्रस्ताव म्हणजे ‘बेटे को सेट करना और दामाद को भेंट करना’ : BJP खासदाराचा सोनियांवर हल्लाबोल

काय म्हणाले शरद पवार?

पुणे शहरातील तब्बल 229 पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन आम्ही सोमवारी सायंकाळी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या भेटीमध्ये कार्यकर्त्यांची ओळख आणि संवाद पार पडला. अजित पवारांच्या बंडानंतर पुण्यातील कार्यकर्त्यांशी पवारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची संख्या पाहून समाधान व्यक्त केलं. तर त्यांनी यावेळी आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत जाणार नाही. असं ठणकावून सांगितलं.

‘मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय’; शेलारांची टीकेवर दानवेंचा घणाघात

तसेच पवार यावेळी म्हणाले की, भाजपकडून पक्षामध्ये जी फूट पाडण्यात आली आहे. तसेच केंद्रीय निवडणुक आयोगाकडून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तरी राष्ट्रवादी कधीही आपल्या विचार धारेशी कधीही तडजोड करणार नाही. असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. एकवेळ नव्याने सर्व काही उभं करायची वेळ आली तरी चालेल. पण भाजपसोबत तडजोड करणार नाही. असा शब्द यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

त्यामुळे कार्यकर्त्यांना याचं समाधान मिळालं की, राष्ट्रवादीची विचारधारा ही कधीही भाजपसोबत जाण्याची नाही. तसेच एकवेळ नव्याने सर्व काही उभं करायची वेळ आली तरी चालेल. पण भाजपसोबत तडजोड करणार नाही. असा शब्द यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांना लढण्यास उर्जा मिळाली असल्याचं यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

Tags

follow us