Download App

Sharad Pawar पूर्वी माझे हिरो होते, पण नंतरच्या काळात… नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल अभिनेते नाना पाटेकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की पूर्वी शरद पवार माझे हिरो होते. पण मग नंतरच्या काळात भ्रमनिरास व्हायला लागला. नाना पाटेकर हे एका वाहिनीला मुलाखत देत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Kajol Trolls: ‘अजून खाली नेस बाई…’ बोल्ड साडीमुळे अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा ट्रोल, म्हणाली…

त्यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, मला राजकारणाबद्दल किंवा इतर कशाबद्दल भाकीत करता येत नाही. पण शरद पवार पूर्वी माझे हिरो होते. हा माणूस महाराष्ट्रासाठी काहीतरी खूप चांगलं करेल. असं वाटत होतं. परंतु नंतरच्या काळात भ्रमनिरास झाला. ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टीमध्ये पूर्वी आम्हाला दिलीप कुमार आवडायचे नंतर अमिताभ असे आवडते हिरो बदलत गेले. त्याचप्रमाणे राजकारणातले हिरो देखील बदलत आहेत. राजकारणात काहीही स्थिर नाहीये. त्यामुळे मी कशावर विश्वास ठेवायचा? कारण हे लोक आज वेगळे बोलतात. दुसऱ्या दिवशी वेगळच बोलतात. अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पाटेकर यांनी दिली.

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त असणार खास उपक्रम

दरम्यान यावेळी इतर राजकीय नेत्यांबद्दल देखील नाना पाटेकर बोलले ते म्हणाले, गडकरी यांचे भाषण मी नेहमी ऐकतो, ते चांगले बोलतात. तसेच ते अजत शत्रू आहेत, कारण विरोधी पक्ष सोबत सत्ताधारी दोन्ही पक्षात त्यांचे चाहते आहेत. तर फडणवीस हे देखील मुद्देसूद भाषण करतात. मात्र राजकारणात सातत्य राखणारी मंडळी कमी झालेत.

Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, काही स्वार्थी राजकारणांनी फार वाटोळ केले. मला कधीही जात आवडत नाही. माझे सर्व समाजात मित्र आहेत. आपण सर्वजण एकत्र राहायचो. त्यामध्ये आपुलकी आणि ओलावा होता. मात्र आज शेजारच्या घरात कोण राहतो? हेही आपल्याला माहीत नाही. काही नतद्रष्ट मंडळींनी हे केलं. मला त्यांची नाव घेता आली असती तर बरं झालं असतं. मात्र नाव घेतली तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम करतोय ते करता येणार नाही. असेही यावेळी नाना म्हणाले.

याच मुलाखतीमध्ये नाना यांनी ठाकरे बंधुंवरदे्खील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर राज आणि उद्धवशी ते नातं राहिलं नाही. कारण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाहीत. त्यामुळे नात एका बाजूने राहत नाही. असं म्हणत नाना यांनी ठाकरे बंधुंवर नाराजी व्यक्त केली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज