Download App

अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांचा पाठिंबा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन पक्षात बंडखोरी केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या राजकीय बंडखोरीने विरोधकांना मोठा धक्का बसला. मात्र, या शपथविधीला शरद पवारांचे (Sharad Pawar) निवटवर्तीय आणि NCP चे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. (Sharad Pawars close associate Praful Patel also in Ajit Pawars rebellion)

अजित पवारांनी बंडखोरी करत शिंदे-सरकारशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दली. अजित पवार यांच्या या बंडाला शरद पवाराचा पाठिंबा असल्याचं बोलल्या जातं. कारण, राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते अजित पवारांसोबत राजभवनात दिसत होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता.

अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन, अजितदादांनाही भेटले; उघड केलं मोठं सत्य

एकीकडे अजित पवारांचा शपथविधी सोहळा सुरू होता तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची फोनाफोनी सुरू होती. प्रफुल्ल पटेल हे त्यावेळी त्यांच्यासोबत असतील असं सांगितलं जात होतं. पण, अजित पवारांच्या शपथविधीला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पटेल हे अजित पवारांच्या सोबत उपस्थित असल्यानं शरद पवारांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदे घेतली. त्यावेळी शऱद पवारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आम्हाला पक्षातील सर्वांचाच आशिर्वीद आहे, असं सांगितलं. त्यामुळं या बंडाला पवारांचं समर्थन असल्याच्या चर्चांना ऊत आला.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधतांना शरद पवारांनी मी खंबीर आहे. लढायला मजुबत आहे, असं सांगत जे आमदार गेले आहे, त्यातील 80 टक्के आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील, असा दावा केला.

 

Tags

follow us