Jayant Patil Shekap : आम्ही झालेल्या पराभवावर आत्मचिंतन करू. कारण निवडून आलो तरी चिंतन करतो आणि पराभाव झाला तरी चिंतन करतो. आता आम्ही ठरवू काय करायचं ते. मात्र, निवडणुकीत ज्या पद्धतीने घोडेबाजार झाला तो चिंतेचा विषय आहे अशी प्रतिक्रिया शेकापचे जयंत पाटील यांनी दिली. (Jayant Patil) काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांशी ते बोलत होते. दरम्यान, मी महाविकास आघाडीसोबत आहे. मी शरद पवारांसोबत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने मविआला तडे; जयंत पाटीलही पराभूत
आज महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. परंतु, असा पराभव झाला म्हणून मी खचणार नाही. मी काम करत राहणार. दरम्यान, शरद पवारांचेही जयंत पाटलांनी आभार मानले आहेत. (MLC Election) शरद पवारांनी या वयातही मला साथ दिली. त्यांनी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत जागून बैठका घेतल्या. मला मोठा वेळ दिला. त्यांची ही साथ मी कधीच विसरणार नाही अशा शब्दांत जयंत पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत. तसंच, आम्ही काही खचून जाणार नाहीत. लढणार आहेत असा हुंकारही त्यांनी यावेळी भरला.