Download App

वाघनखाचा वाद पेटला; शीतल म्हात्रेंकडून विरोधकांना ‘डुप्लिकेट वाघा’ची उपमा

Sheetal Mhatre News : छत्रपती शिवाजा महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेले वाघनखे लंडनहून भारतात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वाघनखाच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्यावतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) ही वाघनखे आणण्यासाठी लंडनला रवाना झाल्याचंही समजतंयं. अशातच ही वाघनखे शिवरायांचीच आहेत का? असा सवाल विरोधकांसह इतिहास संशोधकांकडून केला जात आहे. त्यावरुन शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासंदर्भातील ट्विट म्हात्रे यांनी केलं आहे.

शीतल म्हात्रे ट्विटमध्ये म्हणाल्या, “वाघनखे, कोथळा हे शब्द वापरुन आयुष्यभर राजकारण केलंत आणि आता महाराजांच्या वाघनखांवर संशय घेणारी यांची मुघलांची जात… औरंगजेबाची कबर सजवली..तिला संरक्षण दिलं हे यांच्याच सरकारने… हिंदुत्वाच्या नावावर मतांचं राजकारण करायचं… आणि सरकारमध्ये आल्यावर मुघलांसारखं वागायचं हीच याची नीती!!! असो… छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात येणार म्हणून डुप्लिकेट वाघ घाबरले वाटतं…” अशी खोचक टीका म्हात्रे यांनी केली आहे.

Asian Games 2023 : पदकासाठी खेळाडू भिडले, ट्रान्सजेंडरमुळं मी पदक गमावलं, स्वप्ना बर्मनचं खळबळजनक विधान

इतिहास संशोधक सावंत म्हणाले :

येत्या 16 नोव्हेंबरला जी वाघनखं लंडनहून भारतात येणार आहेत, जी वाघनखं भारतात येणार आहेत, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरलेली आहेत याची नोंद कुठेही आढळून येत नाही. साताऱ्याचे प्रतापसिंह महाराजांनी लंडनला भेट म्हणून ती वाघनखे दिल्याचे पुरावे आढळून येत आहेत, त्यामुळे ही वाघनखे शिवरायांनी वापरलेली नसावेत, असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

Manipur Violence : सीबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

इतिहास संशोधक सावंतांच्या या दाव्यानंतर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. आदित्य ठाकरे यांनी यांच्यासह संजय राऊतांनी या वाघखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पुणेकरांची PMPL झाली कॅशलेस, सुट्ट्या पैशांची कटकट संपली

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या ताब्यात आहेत. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे.

ही वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. ही वाघनखं परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आज रात्री लंडनला जाणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत. सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय 3 वर्षासाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झालं आहे.

Tags

follow us