Download App

आढळराव पाटलांच्या उमेदवारीचं ठरलं? शिरुर लोकसभेत कॉंटे की टक्कर

Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांची महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Group)प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil)आणि मंत्री दिलिप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांचा आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे. महायुतीत शिरुर लोकसभेची जागा ही अजित पवार गटाकडे आहे. आणि त्यामुळे राजकीय समिकरण जुळवण्यसाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी होऊन शिरुर लोकसभेची उमेदवारी करण्यास तयार आहेत, मात्र त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोध होत आहे. त्यावर आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलिप मोहिते यांची भेट घेऊन आढळरावांच्या औपचारिक उमेदवारीची घोषणाच केली आहे. यावेळी मोहिते यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मात्र यावेळी आमदार मोहिते यांचा सूर काहिसा नरमाईचा दिसून आला.

माढ्यात जानकरांची एन्ट्री! माढा ‘रासप’ला द्या, थेट शरद पवारांकडे मागणी

त्याचं झालं असं की, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरचे माजी खासदार आहेत. त्यांना शिरुर लोकसभा पुन्हा लढवायची आहे. हे मनाशी धरुनच त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरल्याचे बोलले जात आहे.

दारूण पराभव समोर दिसत असल्याने बाळराजे गायब; भाजपचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

राष्ट्रवादीत फूट पडून अजितदादांच्या गटानं महायुतीची वाट धरली. त्यामुळं सगळीच राजकीय गणितं पलटली. त्यानंतर आढळराव पाटील हे पुन्हा त्याच वळणावर असल्याचे पाहायला मिळाले. कारण शिरुर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडं आली आहे.

त्यामुळं आढळरावांची गणितं बिघडली. पण त्यांच्यासाठी एक दरवाजा उघडा दिसून आला. तो म्हणजे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडं प्रतिस्पर्धी उमेदवार शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना टक्कर देणारा उमेदवार नाही. त्यामुळे आता आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलिप मोहिते पाटील यांचा पहिल्यापासूनच आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलिप वळसे पाटील यांचाही आढळरावांना विरोधच होता. पण आता अजितदादांनी आपल्या दोन्ही आमदारांची समजूत काढली आहे आणि त्यांना त्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिरुर लोकसभेसाठी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळाच झाल्याचं बोललं जात आहे.

अजितदादांनी आमदार दिलिप मोहिते पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्याचवेळी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करुन त्यांची शिरुर लोकसभेच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी दिलिप मोहिते यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. असं असलं तरी आज आमदार दिलिप मोहिते पाटील यांच्या भाषेमध्ये नरमाई पाहायला मिळाली.

त्यावेळी मोहिते पाटील म्हणाले की, आजपर्यंत आम्हाला गटातटाचा फटका बसला आहे, पण आता आढळराव पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा एक वेगळा गट होऊ नये, अशीच आपली इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. त्यावर अजितदादांनी दिलिप मोहिते पाटील यांची समजूत काढली. त्यानंतर आता आपली आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याला आपली काही हरकत नसल्याचे यावेळी दिलिप मोहिते पाटील यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता आढळराव पाटील यांच्या शिरुर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

follow us

वेब स्टोरीज