पुणेः शिरुर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) उमेदवार व विद्यमान आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या मुलाचे काही जणांनी अपहरण केले. एका खोलीत डांबून त्याचे एका महिलेशी नको त्या अवस्थेत फोटो, व्हिडिओ काढले. फोटो, व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. परंतु गुन्हा नोंदविण्यात आलेले नाही.
आपल्याला आणखी प्रगती करायचीये; सोडवलेल्या प्रश्नांचा वळसे पाटलांनी वाचला पाढा
अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिली आहे. शिरुर हवेली मतदारसंघात शरद पवार गटाचे अशोक पवार आणि अजित पवार गटाचे माउली कटके यांच्यामध्ये लढत होत आहे. दोघांचे जोरदार प्रचार सुरू आहेत. त्यात ही घटना घडली आहे. ऋषिराज हा निवडणुकीचा प्रचारात व्यस्त आहे. एक कार्यकर्ता भाऊ कोळपे आणि ऋषीराज पवार एका ठिकाणी मिटिंगला गेले. त्याठिकाणी ऋषिराजला विवस्त्र केले आणि त्या ठिकाणी एका बाईला विवस्त्र करून दोघांचे फोटो काढले. त्यानंतर दहा कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ऋषिराज याने माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. म्हणून तो बाहेर गेला. ऋषिराजने ही माहिती वडिल यांना सांगितले. या संदर्भात तक्रार करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनला गेले परंतु तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती अॅड. असिम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Video : धनंजयच्या डोक्यात सत्तेची हवा; गुंडगिरीही वाढली, परळीतून पवार कडाडले
तत्परता दाखविले अन् एक पकडला गेला
भाऊ कोळपे हा पवार यांच्याविरोधात होता. परंतु आता पवारांबरोबर आला. मांडवगण येथे जाण्यासाठी तो ऋषिराज यांच्यामागे माझ्या तीन चार दिवस जाण्यासाठी मागे लागला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून ऋषिराज पवार हा त्यांच्याबरोबर प्रचारासाठी गेला. त्याच्याबरोबर मोटारसायकलवरून गेल्यानंतर ऋषिराज याला एका रुममध्ये मारहाण करून डांबून ठेवले. त्यांनी माझ्या तोंडावर कापड टाकून, माझा गळा दाबला, मला जीवे मारण्याचा प्रत्न केला. एकाने एक महिला आणली. तिच्याबरोबर विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपये खंडणी मागितली. मी त्यांच्याशी गोड बोलून, व्हिडिओ, फोटो तुमच्याकडे ठेवा, पैसे घेऊन येतो. मी बाहेर जावून मित्राला बोलवून घेतले. त्यातील एकाला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी ऋषिराज पवार यांनी केली आहे.
याप्रकरणी अशोक पवार यांनी प्रतिक्रिया देताना निंदनीय राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. एखाद्याचे जीवन बरबाद करण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने राजकारण होत असेल, तर हा दुर्देवी प्रकार आहे. तीन आरोपी पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. याच्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे अशोक पवार यांनी म्हटले आहे.