Video : धनंजयच्या डोक्यात सत्तेची हवा; गुंडगिरीही वाढली, परळीतून पवार कडाडले

  • Written By: Published:
Video : धनंजयच्या डोक्यात सत्तेची हवा; गुंडगिरीही वाढली, परळीतून पवार कडाडले

Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वच नेते आक्रमक भाषण करताना करताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. परळीत गुंडगिरी वाढली, काही लोकांच्या डोक्यात सत्ता लवकर गेली, त्यांना पराभूत करा, असं म्हणत पवारांनी मुंडेंवर निशाणा साधला.

‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा!, अजित गव्हाणेंच्या ‘कॅलिबर’ वक्तव्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक 

परळीचे शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली. या सभेला फौजिया खान, खासदार बजरंग सोनवणे, राजेसाहेब देशमुख आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज बऱ्याच दिवसांनी परळीला येणं झालं. अलीकडच्या काळात परळीमध्ये गुंडगिरी वाढलीये. एक काळ असा होती की, महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही आणि आमचे मित्र विरोधीपक्षात होता. तेव्हा या परळींने आम्हाला रघुननाथराव मुंडे यांच्या रुपाने जीवाभावाच सहकारी दिला. त्यांचं जिल्ह्याच्या विकासावर लक्ष होतं. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कसा झाला हे कोडं अद्यापही मला उलगडलं नाही. त्यांची जागा कायम आमच्या अंतरणात आहे, असं ते म्हणाले.

PM Narendra Modi : काँग्रेस, संविधान अन् जम्मू काश्मीर; नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा गाजवली 

परळीत गुंडगिरी वाढली…
पुढं ते म्हणाले, अलीकडच्या काळात परळीला काय झालं हे मला कळत नाही. परळीत गुंडगिरी वाढली. मला इथल्या व्यापाऱ्यांचे पत्र येतात की, त्यांना धंदा करणंही अवघड झालंय. कुणी कोणताही धंदा करायला निघालं की, काहींना या धंद्यावर नियंत्रण हवं असतं, हे चित्र बदलण्याजी गरज आहे, असंही पवार म्हणाले.

त्यांच्या डोक्यात सत्ता गेली…
पुढं पवार म्हणाले की, एके दिवशी पंडितअण्णा आणि धनंजय मुंडे मुंबईत माझ्या घरी आले होते. त्यांनी सांगितलं की, आमच्या काही अडचणी आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मी म्हणालो कसली मदत? ते म्हणाले, हा माझा मुलगा आहे. याच्याकडे लक्ष ठेवा. म्हणून मी पंडितअण्णांच्या विनंतीवरून आम्ही जनतेला नेतृत्व दिले. मी त्यांना संधी दिली. पक्षात घेतले. संघटनेत जबाबदारी दिली. त्यांना आमदार केलं. विरोधी पक्षनेता केलं. नंतर मंत्रीही केलं. त्यांच्याठी जे जे करता येईल, ते ते केलं.

एकेकाळी बीड जिल्ह्याने माझे सर्व आमदार निवडून दिले होते. त्यामुळे तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून मी त्यांना शक्ती दिली. दुर्दैवाने परिस्थिती बदलली. सत्तेत आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. त्यांच्या डोक्यात सत्ता लवकर गेली. आज तुमच्या परिसरात अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामागे कोण आहे हे जनताच सांगेल, लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. लोकांना त्रास देणं सुरू आहे. हे थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र व्हावं लागेलं. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवायची असेल, शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहनही पवारांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube