Abhishek Adsool on Ravi Rana : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे जोरात वाहत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज अमरावती लोकसभेवर नवनीत राणांचा दावा ठोकला. यावेळी त्यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यार टीका केली. आनंदराव अडूसळ यांना नवनीत राणांच्या प्रचाराला यावं लागेल, असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता अभिषेक अडसूळ (Abhishek Adsool) यांनी राणांवर टीका केली.
Shweta Tiwari : श्वेता तिवारीनं अनारकली सूट घालून सोशल मीडियावरचं वाढवलं तापमान
आज माध्यमांशी बोलतांना अभिषेक अडसूळ म्हणाले की, नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती नाम गाडी. या दोघांना काय काम धंदे राहिले नाहीत. अमरावती लोकसभेवर आजही शिवसेनेचा दावा आहे. आणि त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रचाराला यावं लागेल, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.
नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर झालेल्या सुनावणीवरही अभिजित अडसूळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही नवनीत राणा यांची संपूर्ण वंशावली शोधून काढली आहे. जेव्हा ते सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा तिथेही त्यांनी आपले वजन कसे वापरले हे पाहिले. नवनीत राणा, रवी राणा यांना पैशांचा माज आला आहे. यांना वाटतं की, पैसे देऊन ते सुप्रीम कोर्टाला देखील विकत घेऊ शकतात. पण, सुप्रिम कोर्टाचा निर्णय अजून यायचा आहे, असं अडसूळ म्हणाले.
रवी राणा काय म्हणाले?
आनंदराव अडसूळ, अभिषेक अडसूळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गे नवनीत राणांच्या प्रचारासाठी येणार येतील. अडसूळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते राणांसाठी नक्कीच मतं मागतील, राणा यांनी दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या तिकीटाचा निर्णय घेतील. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांचा निर्णय मान्य करू, रवी राणा म्हणाले.