कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर 2’ चा भाग; प्रताप सरनाईकांच्या दाव्याने मोठी खळबळ

Operation Tiger 2 प्रताप सरनाईकांचा कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर 2’चा भाग असल्याचा दावा, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं

Operation Tiger 2

Operation Tiger 2

Pratap Sarnaik claims Kailas Patil is part of ‘Operation Tiger 2’: धाराशिवच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची प्रताप सरनाईकांचा कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर 2’चा (Operation Tiger 2) भाग असल्याचा दावा, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं. चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

CCTV कॅमेऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप

तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला होता. हे कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी कैलास पाटील यांच्यावरच निशाणा साधला. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पाटील अशा प्रकारचे आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार ! फेरतपासासाठी एसआयटी नेमली

सरनाईक यांनी यावेळी मिश्कील टिप्पणीही केली. संबंधित सीसीटीव्हीच्या माध्यमातून कैलास पाटील कुठे जातात, घरी कधी पोहोचतात आणि तुळजापूरला कधी जातात, यावर लक्ष ठेवता येत असल्याचं ते म्हणाले. या माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करू, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा हवा

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या राजकीय घडामोडीनंतर दोन्ही शिवसेना गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आता धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र, कैलास पाटील यांच्याकडून या दाव्यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वरिष्ठांचा विरोध, पण पार्थ पवार ठाम; झिशान सिद्दिकींना मुंबई अध्यक्षपद मिळणार?

पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांवरही सरनाईकांचं भाष्य

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी पिंपरी-चिंचवडमधील उद्योग क्षेत्रातील समस्यांवरही भाष्य केलं. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काही उद्योजक त्रस्त असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांच्या प्रश्नांबाबत पत्र लिहिलं होतं. या पत्रातील खड्ड्यांमुळे उद्योजकांना होत असलेल्या त्रासाच्या मुद्द्याला सरनाईक यांनी दुजोरा दिला.

उदय सामंत उद्योजकांशी संवाद साधणार

उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांशी संवाद साधणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी; ‘या’ राज्याच्या सहप्रभारीपदी नेमले

सरनाईक सध्या धाराशिव दौऱ्यावर असून, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एका बाजूला ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरही सरकारकडून उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Exit mobile version