रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; नियम मोडल्यास परवाना रद्द, नेमके नियम काय?
Marathi टॅक्सी व रिक्षा चालकाला मराठी न आल्यास त्याचा परवाना निलंबित करण्यापासून ते कायमस्वरूपी रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते.
Marathi Language Mandatory for Taxi Driver : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान आता अनिवार्य (Marathi Mandatory for Taxi Driver) करण्यात आले आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित कॅबच्या चालकांनाही या नियमातून वगळण्यात आलेले नाही. मराठी भाषा येत नसल्याचे आढळल्यास चालकाचा परवाना निलंबित करण्यापासून ते कायमस्वरूपी रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे नाही तर माझं नाव द्या; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांबद्दल सनसनाटी दावा
नेमके नियम काय?
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, 2026’ मध्ये याबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
नियम 4 (4) नुसार सार्वजनिक सेवा वाहन चालवण्यासाठी आवश्यक परवाना किंवा अधिकृततेसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच नियम 78 आणि 85 नुसार नवीन परमिट मिळवताना किंवा परमिटचे नूतनीकरण करताना चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिंदेंच्या बैठकीत तुकाराम मुंढेंनी मांडला FDA चा रिपोर्ट; एकनाथ शिंदेंचे थेट आदेश
अॅप-आधारित कॅब आणि इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या वाहनांच्या चालकांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्यास संबंधित चालकाला सक्षम प्राधिकरणाकडून नोटीस बजावली जाऊ शकते. त्यानंतर नियमांचे पालन न केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्याची किंवा तो कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
अमराठी चालकांसाठी प्रशिक्षण
मराठीची अट लागू करताना चालकांना ती भाषा शिकण्याची संधीही परिवहन विभागाकडून दिली जात आहे. यासाठी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ यांच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
RTO कार्यालये आणि भाषा केंद्रांच्या माध्यमातून चालकांना मराठीचे प्राथमिक आणि व्यवहारातील आवश्यक ज्ञान दिले जात आहे. या उपक्रमाचा कालावधी 105 दिवसांचा असून 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 10 हजारांहून अधिक बिगर-मराठी चालकांनी चार तासांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना 17 ऑगस्ट रोजी ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
व्हर्जिन, 2 लाख पगार आणि परदेशवारीची अट; जोडीदारासाठीच्या अपेक्षांची पोस्ट व्हायरल