Download App

Eknath Shinde : इकडं निकाल सुरु असताना सीएम एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी…

Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडं (Shiv Sena MLA disqualification result )संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये (Hingoli)शिवसंकल्प अभियान (Shiv Sankalp Mission)कार्यक्रम सुरु आहे. या शिवसंकल्प अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण टाकलेला आम्ही सोडवला असा घणाघात यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

निकालाची स्क्रिप्ट वरून आली, आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात लागणार; वडेट्टीवारांचा दावा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आले असते का? राज्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं. मागील दीड वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का?

आमदारांच्या अपात्रता निकालाबद्दल कसलीही उत्सुकता अन् काळजी नाही : सुषमा अंधारे

धनुष्यबाण गहाण टाकलेला आम्ही सोडवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद आपल्यासोबत आहेत. आज धनुष्यबाण आपल्यासोबत आहे. मग खरी शिवसेना कोणाची आहे? खरी शिवसेना तुमची-आमची आहे.

ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला, खच्चीकरण केलं, ताटकळत ठेवलं, त्यांचं खच्चीकरण होताना उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले. आज वर्षा बंगला सर्व शिवसैनिकांसाठी कायम उघडा आहे. कोणीही कार्यकर्ता तिकडे येऊ शकतो. आज बदल घडतोय, या राज्यामध्ये विकासाला चालना मिळतेय. मागील अडीच वर्षात त्यांनी राज्यातील प्रकल्प बंद करण्याचं काम केलं.

माझं कुटूंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं माझं मर्यादीत नाही. मी घरात बसून उंटावरुन शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलू लागलो आहे. म्हणून या राज्यात शेतकरी, कामगार, माता भगिणी, ज्येष्ठांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे.

आपण कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर एकच मागणी करत असतो. माझ्या महाराष्ट्रातील बळीराजावरचं संकट दूर कर. राज्यातल्या नागरीकांवरचं संकट दूर कर, मला बाकी काही कमवायचं नाही, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी हेलिकॉप्टरने जाऊन शेती केली चांगलचं आहे ना, हेलिकॉप्टरने जाऊन फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली चांगली गोष्ट आहे ना? असाही खोचक टोला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

follow us

वेब स्टोरीज