Sushma Andhare : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यातच आता एक मोठी बातमीसमोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सचिन अहिर यांच्यासह शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) याही उपस्थित होते. मात्र या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) नाराज झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या बैठकीत उशिरा आल्याने त्यांच्यासाठी खुर्ची सोडावी लागल्याने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे बैठकीला पोहचल्यावर बसायला जागा नव्हती मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं निघून आलो त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावरचं बसणार ना? अशी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यात ठाकरे गटात जे काही नेते उरले आहेत त्यातील सर्वात जेष्ठ नेते हे चंद्रकांत मोकाटे आहेत. चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेत कुठलीही नाराजी नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी दिली. खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सुरु असणाऱ्या बैठकीतून चंद्रकांत मोकाटे हे तडकाफडकी निघून गेले आणि सुषमा अंधारे बैठकीला पोहचल्यावर बसायला जागा नव्हती मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं निघून आलो त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावरचं बसणार ना? अशी खोचक प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना देत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली.
मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता कायदा लागू, होणार ‘हे’ बदल
तर दुसरीकडे पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडून गेले नाहीत, ते सुरवातीपासून बैठकीला उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच स्वबळाचा नारा फक्त मुंबईसाठी आहे. राज्यातील इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार असल्याची यावेळी माहिती संजय राऊत यांनी दिली.