Download App

‘पंतप्रधानांपुढे प्रश्न मांडा अन्यथा राजीनामे द्या’ : मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे ठाकरेंची मागणी

मुंबई : केंद्रीय कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हान शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना दिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशनही बोलाविण्यात यावे अशी मागणी केली. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray’s challenge to Union Minister Nitin Gadkari along with all Maharashtra ministers in Modi Cabinet)

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड हे मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी. राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसालं तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले पाहिजे.

Maratha Reservation : प्रकाश सोळंकेंचे बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातूनही आगीचे लोट

त्यानंतरही निर्णय झाला नाही तर राज्यातील 48 खासदारांनी राजीनामे दिला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी चळवळ उभी राहिली होती, तशी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील एकता दाखवून दिली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे आहे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणीही केली.

Maratha reservation : आंदोलक आक्रमक झाल्यानं आमदार-खासदारांच्या घराला पोलिसांचा खडा पहारा….

मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा, आम्ही त्यांच्यासोबत :

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली, पण ती शपथ त्यांनी मुख्यमंत्रीपदाव बसल्यानंतर दीड वर्षांनी का घेतली, मधल्या काळात हा प्रश्न सोडवायला काही हरकत नव्हती, अशी टीका ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले. आजही ते राज्याच्या पातळीवरती हा विषय सोडवत असतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत, भले तुम्ही आमच्याशी बोलू नका, काही करा, पण मार्ग काढा, अशी विनंती केली.

follow us