Shiv Sena UBT Split : शिवसेना (ShivSena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहेत. हे खासदार उद्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेसेनेतील फुटीमुळे सेनेची नेते प्रचंड संतापले आहे. फुटलेल्या खासदारांचा उल्लेख संजय राऊत यांनी गद्दार म्हणून केला आहे. तसेच या गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा त्यांनी केली आहे. फुटलेल्या खासदारांना दिसेल तिथे तुडवा, अशी भाषा राऊतांनी वापरली आहे. 19 जून रोजी शिवसेनाचा 60 वा वर्धापनदिन आहे. दोन्ही शिवसेनेकडून या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदारांच्या फुटीमुळे दोन्ही सेना एकत्र येणार असल्याने पोलिस यंत्रणा सर्तक झाल्या आहेत.
जून महिना, बंडखोरी अन् संजय… उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील विचित्र योगायोगाची जोरदार चर्चा
शिवसेना व शिवसेना ठाकरे गटाचा 60 वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन नेस्को, गोरेगाव, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमात संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा षंप्मुखानंद हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून शिवसेना ठाकरे गटाचे व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नेस्को, गोरेगाव येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा दरम्यान अचानक निषेध आंदोलन करण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट समोरा-समोर येऊन आपापसात वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा पोलिस यंत्रणांचा अंदाज आहे.
UBT MP Crises : पुण्यात गेले, भेट झाली नाही; ओमराजेंसाठी कैलास पाटील इतके अस्वस्थ का?
आक्रमक नेत्यांवर निगराणी ठेवणार
या दोन्ही कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता शिवसेना (शिंदे व शिवसेना उबाठा गटाचे आक्रमक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर पोलिस यंत्रणा निगराणी ठेवणार आहे. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी दिले आहेत.
