Download App

Pachora : इकडे भाजप, तिकडे बहीण… किशोरआप्पा आमदारकी कशी वाचवणार?

पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर पाटील यांच्यापुढे भाजपचे अमोल शिंदे आणि शिवसेना (UBT) च्या वैशाली सुर्यवंशी यांचे आव्हान आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून जाण्याने आमदारकी संकटात आल्याचे चित्र अनेकांबाबत आहे. पण पाचोऱ्याच्या किशोर आप्पा पाटील (Kishor Patil) यांच्यासाठी तिकीट मिळवण्यापासून संघर्ष करावा लागणार आहे. ‘ज्याचा आमदार त्याला ती जागा’ असे महायुतीचे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. तरीही पाचोऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) या दोन्ही मित्र पक्षांनी दावा ठोकला आहे. काहीही झालं तरी आपण निवडणूक लढवणारच अशी गर्जना दोन्ही पक्षाती नेत्यांनी केली आहे.

गतवेळी भाजपमधून झालेल्या बंडखोरीने किशोर आप्पांना विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे आमदार पाटील यंदाही तशीच बंडखोरी होण्याच्या चिंतेत. त्यातच यंदा त्यांच्या विरोधात त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढणार आहेत. त्यामुळे आप्पांसाठी निवडणूक अवघड होण्यापूर्वी तिकिटासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. (Shiv Sena’s Kishore Patil is challenged by BJP’s Amol Shinde and Shiv Sena’s (UBT) Vaishali Suryavanshi in Pachora assembly constituency.)

नेमकं काय घडतंय ‘पाचोऱ्यात’ पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या व्हिडीओमध्ये..

काँग्रेसी विचारांचा पगडा असणाऱ्या, प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलणाऱ्या पाचोरावासियांनी गत दोन्ही विधानसभा निवडणुकीत किशोर आप्पा पाटील यांना भरभरुन मतदान केले. माजी आमदार आर.ओ. पाटील यांचे पुतणे असलेल्या आप्पांनीही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. 2019 मध्ये तर भाजपमधीलच अमोल शिंदे यांनी बंडखोरी करूनही संघर्ष करत थोडक्यात का होईना पण आप्पा निवडून आले. पण यंदा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

याचे कारण आमदार पाटील यांना महाविकास आघाडीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी अर्थात घरातूनच आव्हान दिले आहे. वाघ यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे. त्यांनी जनतेचे सोडविलेले प्रश्न, दिवंगत ओंकार वाघ यांना मानणारा मोठा वर्ग या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?

आता त्यात भाजपनेही उडी घेतली आहे. गत निवडणुकीत बंडखोरी केलेले आणि भाजपचे विधानसभा मतदार संघ प्रमुख अमोल शिंदे यांच्याशी आमदार पाटील यांना उमेदवारीसाठी लढावे लागणार आहे. अमोल शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे गतवेळी अपक्ष उभे राहुन घेतलेल्या 73 हजार मतांकडे लक्ष वेधत उमेदवारीचा हट्ट धरला आहे. तसेच भाजपाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष अर्च भरणार असल्याचेही त्यांनी सांगून टाकले आहे. भाजपचाही लोकसभेमध्ये झालेल्या चांगल्या मतदानाने कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे.

गेल्या निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली. अर्थात त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा होते हेही उघड सत्य आहे. त्यात त्यांनी किशोर पाटील यांना चांगलेच आव्हान दिले. अगदी शेवटच्या फेरीत किशोर पाटील दोन हजार अशा निसटत्या मताधिक्याने जिंकले होते. त्यामुळे आमदार पाटील यांना पुन्हा बंडखोरीच्या इशाऱ्यामुळे चिंता  वाढली आहे. एकंदरच पाचोरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतील कोणत्या पक्षाला यावरून मोठे रणकंदन माजणार असल्याचे संकेत आहेत. त्यात 2019 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे.

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

इकडे सावरासवर करेपर्यंत आमदार पाटील यांना त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान असणार आहे. आप्पांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानंतरही वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले. मग ठाकरेंनी देखील ही संधी साधत सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली आहे. पण एकूणच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विधानसभा पोहोचण्याच्या मार्गात रोज नव्हे अडथळे येत आहेत.

पाचोरा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, राजपूत, माळी, गुर्जर, बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते. मात्र, 1999 आणि 2004 मध्ये आर. ओ. पाटील तर त्यांच्यानंतर 2014 मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले आहेत.

follow us