Download App

अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका

Image Credit: letsupp

Shivajirao Aadhalrao Patil on Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao Patil ) यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्यामध्ये आढळरावांना त्यांचे विरोधी उमेदवार अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) केलेल्या खोके सम्राट या टीकेवर विचारले असता. आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.

मला अटक करणं हा एक कट होता, डीएस कुलकर्णींचा गंभीर आरोप

यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, अमोल कोल्हेंनी विधानं करताना तारतम्य बाळगावं. केवळ टाळ्या घेण्यासाठी ते आम्हाला खोके सम्राट म्हणतात. पण ते अभिनय सम्राट आहेत की, नट सम्राट आहेत. याच्या खाला मी जाणार नाही. पण तुम्ही जनतेशी गद्दार केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणते सम्राट असून उपयोग नाही.

फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलं? बच्चू कडू म्हणाले, ‘मी त्यांचा आभारी…’

कोल्हे स्वतः ला मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराचं भांडवलं करत आहेत. पण प्रत्यक्षात ते संसदेत ही कमी काळ हजर राहिले. पाच वर्षात संसदेत त्यांची उपस्थिती फक्त 161 दिवस होती. मग उरलेले दिवस तुम्ही कुठे होतात? तर दुसरीकडे ते मतदारसंघातही नव्हते.

लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी उपयोगाला यावं मात्र हे दिल्लीचे नावाखाली कुठे जाता याचा कुणालाही तपास नसतो. तसेच हा पुरस्कार अनेक लोकांना मिळतो मात्र शिरूरचे देशातील एकमेव खासदार आहेत जे स्वतःला संसदरत्न खासदार अशी बिरुदावली लावतात. अशी टीका आढळराव यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.

follow us

वेब स्टोरीज