Amol Kolhe : खतासाठी शेतकरी उन्हातान्हात ताटकळले, कोल्हेंनी खरं उत्तर देत भाजपला फटकारले

Amol Kolhe : खतासाठी शेतकरी उन्हातान्हात ताटकळले, कोल्हेंनी खरं उत्तर देत भाजपला फटकारले

Amol Kolhe News : शिरुर मतदारसंघात यंदाही लोकसभेचं तिकीट मिळताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आगामी काळात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा अजेंडा त्यांनी सेट केला आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांसाठीच्या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो अन् तोही आचारसंहितेच्या काळात. हा मुद्दा कोल्हेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. त्यांनी याच मुद्द्यावर भाजपवर आगपाखड केली. तसेच भाजपला काही प्रश्नांची उत्तरेही मागितली.

खतांच्या गोणीवर देखील पंतप्रधान मोदींचा फोटो आहे मात्र आता आचारसंहितेची बंधनं आल्यामुळे पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यात येत आहे आणि यामुळेच देशातील गरीब शेतकऱ्यांना युरियासाठी ताटकळत उभं राहावं लागत आहे. हे का होत आहे ? याचा स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने द्यायला हवे असा सवाल कोल्हेंनी विचारला.

शिरूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना खासदार कोल्हे यांनी भाजपसह (BJP) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. त्यांनी माध्यमांना सांगितले, की आपला देश कृषिप्रधान आहे. मात्र मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुणीही वाली नाही. म्हणून हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे.

Unmesh Patil News : महायुतीला जळगावचा पेपर टफ! भाजपवर हल्लाबोल करत उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

यानंतर त्यांनी भाजपाकडून होणाऱ्या जाहिरातबाजीवर देखील टीका केली. भाजपला केवळ निवडणुका दिसतात त्यामुळे भाजप प्रचाराच्या हव्यासापोटी जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च करतो. आज खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. मात्र आचारसंहितेची बंधनं आल्यामुळे त्यांचा फोटो हटवण्यात येत आहे.

यामुळेच देशातील गरीब शेतकऱ्यांना युरियासाठी ताटकळत उभं राहावं लागत आहे, असा आरोप कोल्हे यांनी केला. हे असे का होत आहे ? याचा स्पष्टीकरण भाजपने द्यावे, असे कोल्हे म्हणाले.

शेतकरी विरोधी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi scheme) शेतकऱ्यांचा सम्मान नाहीतर अपमान होत आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे दिले जातात मात्र सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयांची खते घेतो आणि त्यावर हे सरकार 18 टक्के जीएसटी वसूल करून 6 हजार रुपये वर्षाला देते. याला शेतकऱ्यांचा सन्मान म्हणता येत नाही.

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, खेड तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी युरियासाठी उन्हातान्हात रांगेत उभं राहावं लागते. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भाजपाच्या काय भावना आहेत हे लक्षात येते, अशी जळजळीत टीका त्यांनी भाजपवर केली.

Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज