Download App

शिवाजीराव गर्जे अन् विटेकरांना विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट? अधिकृत घोषणा बाकी…

शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Image Credit: Letsupp

Ncp Candiate List : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अहमदनगरचे शिवाजीराव गर्जे (Shivsajirao Garje) आणि परभणीचे राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून गर्जे आणि विटेकर यांना विधानपरिषदेत उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नसून पुढील काही वेळात घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.

आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवणार ‘बाबू’; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मागील अनेक वर्षांपासून शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीच म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलीयं. गर्जे यांनी त्यांच्या कारकीर्दीत सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. 2014 मध्ये काही काळासाठी राज्यमंत्री दर्जा असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते.

लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर ‘संचारबंदी’, अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

तर परभणी लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे राजेश विटेकर आग्रही होते. मात्र महायुतीच्या कोट्यातून ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. आता मात्र, त्यांना विधानपरिषदेत उमेदवारी देण्यात येणार असण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना राज्यपानियुक्त आमदारांमध्ये संधी देऊ, असे सांगण्यात आले होते.

follow us

वेब स्टोरीज