Download App

Anil Parab : अध्यक्षांच्या वेळापत्रकात कुछ तो गडबड है ! परबांचा नेमका आरोप काय ?

Anil Parab : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार 13 ऑक्टोबरपासून नियमित सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेळापत्रक पाठवले आहे. ठाकरे गटाने मात्र या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर निशाणा साधला.

परब म्हणाले, अध्यक्षांचे वेळापत्रक (Anil Parab) म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर आता तारखा पडत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे. पुरावे पाहण्याची गरज नाही. वेगळी सुनावणी घेण्याचीही गरज नाही. 23 नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा कळवल्या आहेत. त्यानंतर उलट तपासणी सुरू होणार आहे. परंतु, उलट तपासणी किती दिवस सुरू राहणार काही माहिती नाही. एक महिन्याच्या काळात हे प्रकरण संपायला हवं. पण, आमदार अपात्र होतील या भीतीनेच वेळकाढूपणा केला जात आहे असा आरोप परब यांनी केला. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात हे वेळापत्रक मांडण्यात येईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू, असे परब म्हणाले.

बबन घोलप आमच्याकडे आले तर…; बावनकुळेंच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याचे समजते.  या वेळापत्रकानुसार एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर अंतिम सुनावणीसाठी इतका वेळ का, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा वाद आणखी चिघळणार असल्याचेच दिसते.

असं आहे सुनावणीचं वेळापत्रक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यांत अंतिम सुनावणी होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्या अशी मागणी शिंदे गटाने केली होती. या गोष्टींचा विचार करून वेळापत्रक तयार करण्यात आले. सर्व आमदारांना वेळापत्रक दिले आहे. आता मात्र ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेतले जात असल्याने हे वेळापत्रकही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Video : संजय राऊत म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर; नितेश राणेंनी उडवली खिल्ली

Tags

follow us