बबन घोलप आमच्याकडे आले तर…; बावनकुळेंच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन

  • Written By: Published:
बबन घोलप आमच्याकडे आले तर…; बावनकुळेंच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) आणि त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं. बबन घोलप आमच्याकडे आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. त्यांना ती निवड करायची आहे. आम्ही कोणालाही आमच्या पक्षात येण्यास सांगत नाही, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. घोलप यांच्या कन्या आणि भाजप नेत्या तनुजा घोलप (Tanuja Gholap) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

शिर्डी लोकसभेच्या जागेवरून उद्धव ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या मतदार संघातून आपली उमेदवारी निश्चित आहे, असं धरून काही दिवसांपासून बबन घोलप तयारी करत होते. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. वाकचौरे हे शिर्डीतून उबाठाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे बबनराव घोलप यांची नाराजी वाढली आहे.

परिणामी, घोलप यांनीही उपनेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता, मात्र पक्षाने तो स्वीकारला नसून त्यांना प्रतिक्षेत ठेवले आहे. अद्याप ठाकरेंकडून घोलपांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं ते उबाठातून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. काहीच दिवसांपूर्वीच घोलप यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तर त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

Naseeruddin Shah: वडील मुलांच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाहचे भाष्य; म्हणाले, ‘आयुष्यातील खलनायक…” 

घोलप पिता-पुत्र ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्यचा चर्चा सुरू झाल्या असून यामुळं ठाकरे गटात अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे. तर देवळाली मतदारसंघ हा एकेकाळी घोलपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अशा स्थितीत घोलप यांना पक्षात आणण्यासाठी भाजपही उत्सुक असल्याचे चित्र आहे. बावनकुळे यांनी बबन घोलप आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही, असं विधान केलं. बावनकुळेंच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातही खळबळ उडाली आहे.

घोलपांनी प्रकाश आंबेडकर, शरद पवार यांच्या भेटी घेतल्या. आता बावनकुळेंनी घोलपांना पक्षात येण्याचा ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळं आता घोलप काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube