Download App

“केवळ ठाकरेंच्या मनात आले म्हणून काहीही होऊ शकत नाही…” शिवसेनेतील हुकूमशाही नार्वेकरांकडून संपुष्टात

Shivsena MLA Disqualification Verdict : शिवेसेनेमधून (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना नेतेपदावरुन हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना नाही. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना हटवू शकत नाहीत. शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिंदे यांना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते, असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी नोंदवलं आहे.

Fighter Movie: IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय सिनेमांची घोषणा

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकाल वाचनात म्हटलं आहे की, पक्ष प्रमुखाचं मत अंतिम हे ग्राह्य धरणे याला माझी सहमती नाही. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हाच त्या पक्षासाठी सर्वोच्च असल्याचे मत यावेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

Eknath Shinde : इकडं निकाल सुरु असताना सीएम एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी…

पक्षप्रमुखाला थेट कोणालाही पक्षातून काढता येत नाही. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचेच यावेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं.

नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त आपल्याला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाप्रमाणं पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय मानला जायला हवा, त्यासाठी ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले पुरावे ते मान्य करण्यासाठी पुरेसे नसल्याने हा मुद्दा अमान्य केला जात असल्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

पक्षातून किंवा पदावरुन कोणालाही काढण्याबद्दलचे पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच त्यांनी घ्यायला हवेत, असं शिवसेनेच्या पक्ष घटनेत नमूद आहे. त्यामुळं शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरुन काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही असं स्पष्ट निरिक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं.

follow us