Download App

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party completed 57 years, Firebrand leaders form party)

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…

मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. मराठी अस्मिता, भूमिपुत्रांना नोकऱ्या, हिंदुत्व अशी विविधस्तरावर ही वाटचाल झाली. १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपच्या साथीने महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकला. त्यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने आपला मुख्यमंत्री बनवला. या प्रवासात शिवसेनेला छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासारखे बडे नेतेही शिवसेनेतून बाहेर पडले. शुन्यातून उभ्या राहिलेल्या या संघटनेने मोठे बंड पाहिले आणि त्यातून पुन्हा उभं राहतं सत्तेपर्यंत मजल मारली आहे

१९ जून २०२३ रोजी शिवसेना ५७ वा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

आनंद दिघे :

– आनंद चिंतामणी दिघे शिवसेना पक्षाचे नेते आणि पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते.
– दिघे यांनी ठाण्यात शिवसेनेचा प्रभाव वाढवला.
– ठाण्यातल्या बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला दिघे यांची हजेरी असायची.
– त्यांनी शिवसेनेसाठी स्वतःच अख्खं आयुष्य अर्पण केलं होत.
– धर्मवीर या चित्रपटामधून आनंद दिघे हे पुन्हा चर्चेत आले होते.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

मनोहर जोशी :

– बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून मनोहर जोशींची ओळख.
– 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौर.
– 1995 ते 1999 या काळात शिवसेना भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री.
– वाजपेयी सरकारच्या काळात 2002 ते 2004 पर्यंत ते लोकसभा अध्यक्ष होते.

लंकेंकडून विखे पाटलांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, तुझ्या पोराला…

नारायण राणे :

– 1996 मध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून कार्यरत.
– 1999 मध्ये शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
– 2005 मध्ये शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
– 2009 पुन्हा महसूल मंत्री पदाची जबाबदारी.
– 2017 मध्ये ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना केली.
– 2019 मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपत विलीन केला.
– 2021 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी.

बावनकुळे हे गांभीर्याने घेण्यासारखे राजकारणी नाहीत; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

छगन भुजबळ :

– शिवसेनेतूनच छगन भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात.
– 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश.
– 2 वेळा मुंबईचे महापौर पद भूषवले.
– 2 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.
– 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते होते.

प्रमोद नवलकर :

– प्रमोद नवलकर हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर सलग 30 वर्षे निवडून गेले होते.
– 1995 ते 1999 या काळात सांस्कृतिक खात्याची जबाबदारी नवलकर यांच्याकडे होती.
– 1999 – 2000 चा विधानपरिषदेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे मानकरी.
– मिड डे, महाराष्ट्र टाइम्स, मार्मिक, सामना, नवशक्तीसाठी लिखाण करत होते.
– 20 नोव्हेंबर 2017 रोजी नवलकर यांचे निधन झाले.

दत्ताजी नलावडे :

– शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू साथीदार.
– नलावडे हे मुंबईचे महापौर आणि युती सरकारच्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते.
– 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रदीर्घ आजाराने दत्ता नलवडे यांचे निधन झाले.

‘ते’ अजूनही पोरकट, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याची शरद पवारांनी उडवली खिल्ली

सुधीर जोशी :

– शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची होती.
– शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून जोशींची ओळख.
– जोशी शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते.
– भाजप-सेना युती सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री झाले.
– पदवीधर मतदार संघाचे पहिले आमदार.
– विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.
– शिक्षण मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कारकीर्द गाजवली.
– वयाच्या 81 व्या वर्षी 2022 मध्ये घेतला जगाचा निरोप.

लीलाधर डाके :

– बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे सुरुवातीचे नेते होते त्यामध्ये लिलाधर डाके यांचा समावेश होतो.
– मनोहर जोशी सरकारच्या काळात त्यांच्याकडे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी होती
– प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
-‘शिवसेना’ या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहिले.

वामनराव महाडिक :

– शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून वामनराव महाडिक यांची ओळख.
– 1978 मध्ये मुंबईचे महापौर होते.
– 1980 ते 1986 दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य.
– 1990 मध्ये दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेचे पहिले खासदार म्हणूनही मान मिळवला.
– 12 ऑक्टोबर 1999 रोजी वामनराव महाडिक यांचे निधन झाले.

Tags

follow us