Download App

संतोष देशमुख हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा; संजय राऊतांची मागणी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.

Sanjay Raut on Beed Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्येचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मोठी मागणी केली. हा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. या प्रकरणी कुणालाही सोडणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पण आतापर्यंत त्यांनी किती जणांनी कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे असेही राऊत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले, बीडचा विषय हा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था या संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. अनेक वर्षांपासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीडने अनेक खून पाहिले अनेक खून पचाविले. पण संतोष देशमुखच्या हत्येनंतर जी वाचा फुटली त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारला देखील हालचाल करावी लागली का ? सरकारला असे खून वाचवायची सवय आहे.

मोठी बातमी! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती; पुण्यात CID समोर हजर पहा व्हिडिओ

सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या त्यांचा वावर यामुळे अनेकांच्या मनात शंका येऊ शकतात. की खरोखर न्याय मिळेल का? फडणवीस म्हणतात की कोणालाही सोडणार नाही पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला सोडलयं आणि किती जणांना अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे. गेल्या काही काळामध्ये फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे. रक्ताचे डाग धूवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे आणि त्यांच्या आक्रोश किंकाळ्या दाबल्या आहेत. किती जणांना अडकवलं आहे याची एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतः त्यांचे रिपोर्ट घ्यायला पाहिजे असा टोला राऊत यांनी लगावला.

वाल्मीक कराडला अटक केली पण हाच खटला जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे. आतापर्यंत बिल क्लिंटन माहिती होतं, आता बीड क्लिंटन आलं आहे. पहिले बिल क्लिंटनचे प्रकरण येत होतं आता बीड क्लिंटनचे प्रकरण येत आहे. फडणवीस यांनी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे. आम्ही वाट पाहत होतो मुख्यमंत्री नेमकी कोणती पावलं टाकत आहे. बीड संदर्भात एक अटक झाली.परभणी संदर्भात अनेक अटका व्हायच्या आहेत. शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या विषयासंदर्भात अगदी गंभीर आहेत ते सातत्याने संपर्क ठेवून आहेत राजकीय वळण त्याला मिळू नये असेही संजय राऊत म्हणाले.

बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग, प्रशासनाचं स्पष्टीकरण; रोहित पवारांच्या ट्विटने ट्विस्ट!

एका पराभवाने खचणारी औलाद आम्ही नाही

आगामी महापालिका निवडणुकांवर राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभा जिंकलो भाजपाचा पराभव केला. येथून सुरुवात करावी विधानसभेत आम्हाला अपयश आले याचे कारण सर्वांना माहित आहे. हे कारण घेऊन देश रस्त्यावर उतरला आहे. 14 महानगरपालिकेत निवडणुका घेतल्या गेल्या नाही याच उत्तर त्यांनी द्यावं. विधानसभेत जो प्रयोग केला तो यशस्वी झाल्यावर महापालिकेच्या निवडणुका तुम्हाला लढायच्या आहेत. एका पराभवाने खचणारी औलाद आम्ही नाही. पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे त्याच तारखेला आम्ही लढू संघर्ष करू आणि महानगरपालिकेवरील मराठी माणसाचा झेंडा कायम ठेवू असे खासदार संजय राऊत म्हणाले.

follow us