मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकरांची पक्ष सोडताना भावूक पोस्ट, म्हणाल्या…

Tejashwi Ghosalkar यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. यावर शिक्का मोर्तब झालं. कारण याबाबत घोसाळकरांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.

Tejashwi Ghosalkar

Tejashwi Ghosalkar

Shock to Udhhav Thackeray in the face of Mumbai Municipal Corporation! Tejashwi Ghosalkar’s emotional post on leaving the party : ऐन मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. यावर आता शिक्का मोर्तब झालं आहे. कारण याबाबत स्वत: घोसाळकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे. यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचं ही पाहायला मिळालं आहे.

नेमकं काय म्हणाल्या तेजस्वी घोसाळकर?

प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो,

आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत… पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले.लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला.

काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणूनच..,; तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं

सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर – बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं….. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली.

Fog In Delhi : दिल्लीत दाट धुक्यांची चादर; विमानसेवा विस्कळीत…

त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे.

https://www.instagram.com/p/DSRM0e7CF30/?hl=en&img_index=1

जनआंदोलनापुढे महापालिका नमली! तपोवन परिसरात 15 हजार वृक्षांच्या लागवडीचा निर्णय…

अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन.

…तरच मीरा भाईंदर निवडणुकीत महायुती होणार, प्रताप सरनाईकांनी मांडली स्पष्ट भूमिका

जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन. आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना. आपली नम्र, तेजस्वी अभिषेक घोसाळकर

भाजपचं धक्कातंत्र कायम! भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन

दरम्यान ठाकरेंना सोडल्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदी तेजस्वी यांची वर्णी लागल्यापासूनच त्या भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्यानंतर आता दादारच्या वसंत स्मृतीमध्ये त्यांचा हा प्रवेश पार पडला आहे.

Exit mobile version