काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणूनच..,; तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं
नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणूनच कट रचण्यात आल्याचं स्पष्टीकरण आयएएसस अधिकारी तुकाराम मुंडेंनी दिलंय.
IAS Tukaram Mundhe : आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्याविरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका मांडलीयं. नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून कट रचण्यात आल्याचं तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय.
पुढे बोलताना मुंढे म्हणाले, एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. मी नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून तेव्हापासूनच माझ्या विरोधात वारंवार कट रचून त्रास दिले जात आहे. जे खोटे आरोप लावण्यात आले त्याची चौकशी झाली, मला क्लीन चीट मिळाली, तरी वारंवार तेच आरोप करून मानसिक त्रास दिले जात आहे. ही एका प्रामाणिक अधिकाऱ्याची हर्रासमेन्ट असल्याचं मुंढेंनी म्हटलंय.
तसेच मला नागपूरच्या माझ्या कार्यकाळात काम करू दिले नाही. काहींनी अनेक अडथळे आणले. खोटे आरोप करून विविध चौकश्या माझ्या मागे लावल्या. चौकशीत मी निर्दोष आढळलो. तरी माझ्यावर तेच आरोप वारंवार करण्यात आले. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. एकप्रकारे ही हर्रासमेन्ट नाही का? मी झुकलो नाही, म्हणून माझ्या विरोधात महिलांना समोर करून खोटे आरोप लावले गेले. महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकादेशीर रित्या नोकरी करत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव आणला, असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Video : ठाकरेंच्या फक्त घोषणा; फडणवीस सरकारची थेट मदत, महाले काय म्हणाल्या?
दरम्यान, मी स्वाक्षरी करण्याऐवजी प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व 17 जणांना बेकायदेशीररित्या मिळवलेल्या नोकरीतून बडतर्फ केले. त्यामध्ये एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा ही समावेश होता. त्यामुळे त्या आमदाराने माझ्या विरोधात वारंवार मोहीम उघडली. ज्या प्रकरणातून मला क्लीन चीट आधीच मिळाली आहे, तेच आरोप वारंवार आणि परत परत करून एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? असा थेट सवाल तुकाराम मुंढेंनी केलायं.
