Download App

Shreekant Shinde : स्वतः ची ओळख काकाच्या नावाने… अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला खासदार शिंदेंचं उत्तर

Shreekant Shinde On Ajit Pawar : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान राज्यातील 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

Big Breaking! जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

यमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकाच्या प्रचार रिंगणात उतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रचार सभांसाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली होती. अजिप पवार म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कर्नाटकला गेले आहेत. त्यांना तिकडे कोण ओळखतं.’

अजितदादांनी केली शिंदेंची नक्कल; म्हणाले, स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?

त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘मी ऐकलं अजित पवारांनी टीका केली की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कर्नाटकला गेले आहेत. त्यांना तिकडे कोण ओळखतं पण ज्या माणसाने आपल्या काकाच्या नावाने आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांनी शिंदे साहेबांच्या ओळखीबद्दल बोलू नये. शिंदेनी जे पाऊल उचललं ते आपल्याला जमलं नाही. तेव्हा ही तुमची काकांनी हवा काढून घेतली.’ असं उत्तर श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांना दिलं आहे. तसेच पुढे त्यांनी अजित पवारांच्या एकनाथ शिंदेवरच्या स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? या टीकेलाही उत्तर दिलं.

Tags

follow us