Download App

NCP Political Crises : आमदार आले, गेले.. पुतण्याने साथ सोडली… पण शरद पवारांच्या खास मित्राची साथ कायम!

Shrinivas Patil with Sharad Pawar : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीची धुसफूस, भाजपची रणनीती अन् काँग्रेसचे अच्छे दिन.., पवारांच्या बंडानंतर वडेट्टीवारांनी सांगितलं मनातलं…

शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत जनतेला एकप्रकारे सादच घातली आहे. दरम्यान पुतणे अजित पवारांनी जरी बंड केलं असलं तरी यावेळी शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. ते ज्यांच्यासाठी पवारांनी भरपावसात भाषण केलं ते पवारांचे खरे मित्र खासदार श्रीनिवास पाटील. (Shrinivas Patil stand with Sharad Pawar in NCP Political Crises)

भुजबळ, वळसे पाटील, पटेल हे…; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

पवारांचं आणि साताऱ्याचं खास नात आहे. ते म्हणजे त्यांच्या गुरूस्थानी असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकी वेळी याच साताऱ्यामध्ये पवारांचे मित्र आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी घेतलेली पावसातील सभा प्रचंड गाजली होती. तर याच सभेने भाजपच्या लाटेत देखील श्रीनिवास पाटलांचा विजय झाला.

तेच श्रीनिवास पाटील पुतणे अजित पवारांनी जरी बंड केलं असलं तरी यावेळी शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. ते आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं त्यावेळी पवारांच्या सोबत होते. तर या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी देखील ते म्हणाले की, ‘राजकारणात पुरोगामी धोरण स्वीकारलं, ज्या नेत्यानं गोरगरीबांना न्याय दिला त्या माझ्या मित्राची कायमच साथ देईन.’ त्यामुळे श्रीनिवास पाटील हेच पवारांचे खरे मित्र ठरले आहेत.

Tags

follow us