राष्ट्रवादीची धुसफूस, भाजपची रणनीती अन् काँग्रेसचे अच्छे दिन.., पवारांच्या बंडानंतर वडेट्टीवारांनी सांगितलं मनातलं…

राष्ट्रवादीची धुसफूस, भाजपची रणनीती अन् काँग्रेसचे अच्छे दिन.., पवारांच्या बंडानंतर वडेट्टीवारांनी सांगितलं मनातलं…

राष्ट्रवादीत सुरु असलेली धुसफूस ते भाजपची रणनीती अन् आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावर आता काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

NCP Political Crises: भाजप-अजित पवार एकत्र, एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या विखे-लंकेंपैकी आगामी लोकसभेला कोणाची वर्णी लागणार?

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेतून खाली आल्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरु होती. अजित पवारांचा कल सत्तेकडे अधिक असल्याचं दिसून येत होतं. शरद पवारांनी अजित पवारांना अनेकदा समजावून सांगितलं होतं. पण अजित पवार भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत होतं, असं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी, जयंत पाटलांचा उपरोधिक टोला…

कालच्या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट्स पाहुन सत्ताधाऱ्यांचा पाय आणखीनच खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण 90 टक्के लोकांनी या अभद्र प्रकाराला विरोध दर्शवला होता, तसेच गलिच्छ शब्दांत कमेंट्सही दिल्या होत्या. त्यामुळे जनतेचा कल हा सत्ताधारी सरकारच्याविरोधात असल्याचं दिसून येत आहे.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जातीवाद, हिंसाचार, राज्यात अस्थिरता आणून मजबूत होता येईल का याची चाचपणी सत्ताधारी सरकारकडून करण्यात येत होती. मात्र, जातीय तेढ निर्माण झाल्यानंतरही त्यांना यश न आल्याने कालचा प्रयोग भाजपने केला असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

एवढंच नाहीतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना अधिक काळ आपला निर्णय थांबवता येणार नसून आगामी काळातला धोका लक्षात घेता भाजपने ही रणनीती आखल्याचं वडेट्टीवारांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, कालच्या प्रकारानंतर अनेक नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, काय करुन बसलो अन् काय फसगत झाली, अशी गत शिंदे गटाच्या आमदारांची झाल्याचं दिसून आल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच आगामी काळात काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष महाविकास आघाडी म्हणून राज्यातले प्रश्न घेऊन जनतेत उतरणार आहोत, त्यामुळे पुढील काळात कॉंग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचा विश्वासही वडेट्टीवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube