Download App

‘… तर मी 1 मतांनी मागे कसं काय?’, रवींद्र वायकरांचा विरोधकांना प्रतिसवाल

Ravindra Waikar : मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी आज मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची

  • Written By: Last Updated:

Ravindra Waikar : मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी आज मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सुरु असणाऱ्या वादावर देखील आपली प्रतिक्रिया देत सर्व घटनाक्रम सांगितला.

यावेळी रवींद्र वायकर म्हणाले, आज मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत त्यांचे मला सहकार्य लाभले होते त्यामुळे भेट घेणे महत्वाचे होते असं रवींद्र वायकर म्हणाले. तसेच ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

रवींद्र वायकर म्हणाले, देशात लोकशाही आहे, कोणीही न्यायालयात दाद मागू शकतो, मी मतमोजणी केंद्रात गेलो होतो मात्र मला अजूनही निकाल देण्यात आला नाही, तुम्ही बसा असं मला सांगण्यात आलं. आज विरोधकांकडून ईव्हीएम हँक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे मात्र जर ईव्हीएम हँक झाला असता तर मी 1 मतांनी मागे कसा होतो असा सवाल उपस्थित करत त्यांनी मी वर्कोहोलिक आहे, त्यांच्यासारखं अल्कोहोलिक नाही असा टोलाही त्यांनी लावला.

तर खासदार संजय राऊत यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करणाऱ्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर मोठा आरोप करत त्यांचा वायकर यांना विजयी करण्यामध्ये मोठा हात आहे असा आरोप केला होता यावर बोलताना वायकर म्हणाले, कोणावर कोणाचा दबाव होता हे सांगू शकत नाही. असू शकेल कोणाचं दबाव पण तिकडे सगळीकडे कॅमेरे लावले आहेत. माझ्या विरोधात ज्या उमेदवारानेतक्रार केली आहे त्याला हजार मतही पडले आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी वेळी विचारला. माझ्या विरोधात कोणाच्या सांगण्यावरून तक्रार करण्यात येत आहे हे सर्वांना माहिती आहे असं देखील यावेळी वायकर म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांना  ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरोधात अवघ्या 48 मतांनी विजय घोषित करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी अमोल कीर्तिकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली असता त्यामध्ये  वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आहे आणि त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली होती.

शेअर बाजार प्रकरणात शेवगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद?; गुंतवणूकदारांकडून रास्ता रोको आंदोलन

यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी  26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करत रविंद्र वायकर यांची 48 मतांनी विजय झाल्याची घोषणा केली होती.

follow us